43.7 C
Gondiā
Monday, June 8, 2026
Home गुन्हेवार्ता भरधाव इनोव्हाची मोटार सायकलला धडक,३ गंभीर जख्मी

भरधाव इनोव्हाची मोटार सायकलला धडक,३ गंभीर जख्मी

0
288

blank

चित्रा कापसे/तिरोडा,दि.१३ः-तिरोडा -तूमसर मार्गावरील येडमाकोट येथून मुंडीकोटा कडे ट्रिपल सीट जाणाऱ्या मोटार सायकलला तिरोडाहून अकोल्याकडे जात असलेल्या भरधाव इनोव्हा कारने धडक दिली. यात मोटार सायकलवरिल तिघे जण गंभीर जखमी झाल्याने त्यांच्यावर भंडारा येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
ही घटना काल दिनांक १२/८/२०२५ ला दुपारी दरम्यान घडली, याविषयी सविस्तर वृत्त असे की येडमाकोट येथील लक्ष्मण दमाहे मोटार सायकल क्रमांक एमएच ३५ एपी ३४५१ ने पत्नी व नातिन सोबत मुंडीकोटाकडे जात असतांना भरधाव वेगाने येणाऱ्या इनोव्हा कारने धडक दिली. तिन्ही जण रस्त्याच्या खाली पडून गंभीर जखमी झाले. लक्ष्मण दमाहे, कोल्हाबाई दमाहे व सोनी भरत बन्नाटे (वय २० वर्षे) यांच्या समावेश आहे. जख्मीना सुरवातीला तुमसर येथील रुग्णालयात प्रथमोपचाराकरिता नेण्यात आले मात्र परिस्थिती गंभीर असल्याने पुढील उपचाराकरिता भंडारा येथे पाठविण्यात आले.
अपघात स्थळी मोठा जमाव एकवटला होता. काही वेळ वाहतूक कोंडी झाली होती. यावेळी तिरोडा पोलिस स्टेशनचे शिपाई विदेश अंबुले, प्रणव तिवारी, वाहतूक पोलीस विनोद चवळे, महिला शिपाई नयना व स्थानिक लोकांनी रस्त्यावरील वाहतूक सुरळीत केली.

blank