42.4 C
Gondiā
Sunday, June 7, 2026
Home राजकीय सुनील फुंडे सलग तिसऱ्यांदा भंडारा जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी, प्रदीप पडोळे उपाध्यक्ष

सुनील फुंडे सलग तिसऱ्यांदा भंडारा जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी, प्रदीप पडोळे उपाध्यक्ष

0
150

blank

भंडारा,दि.१३ :- जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्ष, उपाध्यक्षपदाची निवडणूक आज पार पडली. बिनविरोध पार पडलेल्या या निवडणुकीत सुनील फुंडे यांची अध्यक्षपदी तर प्रदीप पडोळे यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. दरम्यान, सुनील फुंडे यांची सलग तिसऱ्यांदा अध्यक्षपदी निवड करण्यात आली.

काही दिवसांपूर्वी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत सहकार पॅनलने 21 पैकी 17 जागा जिंकत ऐतिहासिक विजय मिळवला होता. त्यानंतर आज अध्यक्ष, उपाध्यक्षपदाची निवड पार पडली.

अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर सुनील फुंडे यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले. आजवर जिल्हा बँकेने खूप चांगली कामगिरी केली, प्रतिकूल परिस्थितीतून आम्ही बँकेला वर आणले. बँकेच्या प्रगतीसाठी माझ्यासह आजवरच्या संचालक मंडळानेही मेहनत घेतली आहे, यापुढेही आम्ही सर्व पदाधिकारी बँकेला मोठं करण्यावर लक्ष देऊ. ही बँक शेतकऱ्यांची बँक आहे, त्यांचा विश्वास बँकेत जपला जाईल आणि बँक आणखी नवी उंची गाठेल, महाराष्ट्र राज्यातही आपली बँक अग्रेसर होती आणि राहील याची ग्वाही देतो, अशा भावना सुनील पुंडे यांनी व्यक्त केल्या.

blank