35.8 C
Gondiā
Saturday, June 6, 2026
Home Top News समृद्धी महामार्गावर कामगारांना ट्रकने उडवलं दोघांचा जागीच मृत्यू, 3 जखमी

समृद्धी महामार्गावर कामगारांना ट्रकने उडवलं दोघांचा जागीच मृत्यू, 3 जखमी

0
68

blank

छत्रपती संभाजीनगर– समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झालाय. सीसीटीव्ही बसवण्याचे काम करणाऱ्या कामगारांना भरधाव ट्रकने उडवले. या दुर्घटनेत दोन कामगारांचा जागीच मृत्यू झाला, तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे. दुपारच्या वेळी जेसीबीच्या बाजूला बसून जेवण करत असताना जेसीबीसह कामगारांना ट्रकने उडवलं. या अपघाताने मोठी खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, समृद्धी महामार्गावरील 406 पॉईंटवर सीसीटीव्ही बसवण्याचं काम सुरू होतं. दुपारच्या सुमारास काही कामगार जेसीबीच्या बाजूला बसून जेवण करत होते. त्याच वेळी भरधाव वेगाने आलेल्या ट्रकने अचानक जेसीबी आणि तेथील कामगारांना जोरदार धडक दिली. ट्रकची धडक इतकी जोरदार होती की कामगारांना सावरायलाही वेळ मिळाला नाही. या भीषण अपघातात दोन कामगारांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. या अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली.अपघातानंतर परिसरात गोंधळ उडाला. जखमी कामगारांना तातडीने उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथे हलवण्यात आलं आहे. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती मिळत आहे.

CCTV बसवून जेवायला बसले अन् …
समृद्धी महामार्गावर सीसीटीव्ही बसवण्याचं काम सुरू असताना ही दुर्घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. दुपारच्या वेळी जेसीबीच्या बाजूला बसून जेवण करत असताना ट्रकने जेसीबीसह कामगारांना उडवल्याने ही घटना घडली. घटनेची माहिती मिळताच पोलिस आणि महामार्ग सुरक्षा पथक घटनास्थळी दाखल झाले. समृद्धी महामार्गावर घडलेल्या या अपघातामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. कामगार सीसीटीव्ही बसवण्याचं काम करत असताना ही दुर्घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. सध्या या घटनेनंतर जखमींवर उपचार सुरू असून अपघातात मृत्यू झालेल्या कामगारांची ओळख अद्याप समोर आलेली नाही. अपघाताचे नेमके कारण शोधले जात आहे. समृद्धी महामार्गावर झालेल्या या दुर्घटनेमुळे कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

blank