24.5 C
Gondiā
Saturday, August 15, 2026
Home गुन्हेवार्ता नाशिकमध्ये बलात्कार प्रकरणात भोंदूगिरी करणाऱ्या मांत्रिकास अटक

नाशिकमध्ये बलात्कार प्रकरणात भोंदूगिरी करणाऱ्या मांत्रिकास अटक

0
79
नाशिक-बलात्कार प्रकरणात भोंदूगिरी करणाऱ्या मांत्रिकास अटक करण्यात आली आहे. बलात्काराच्या गंभीर गुन्ह्यातील आरोपी अशोक खरात उर्फ स्वघोषित कॅप्टन याला नाशिक क्राइम ब्रांच युनिट 1 ने अटक केली आहे. संबंधित आरोपीविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपासात पोलिसांनी तब्बल 58 व्हिडिओ जप्त केल्याची माहिती मिळाली आहे. या व्हिडिओंमध्ये काही नामांकित महिला व सेलिब्रिटी संबंधित असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिली आहे.
नाशिक पोलिसांकडून जप्त करण्यात आलेल्या व्हिडिओंची तपासणी सुरू आहे. त्यामधून आणखी धक्कादायक बाबी समोर येणार आहे. नाशिकमधील खरात उर्फ कॅप्टन या भोंदूगिरी करणाऱ्या मांत्रिकाला क्राइम ब्रांच युनिट एकने अटक केली आहे. तर या मांत्रिकाच्या विरोधात एका महिलेने तक्रार दिली होती. एका महिलेला धमकी देऊन आणि गुंगीचे औषध देऊन एका महिलेवर या मांत्रिकाने बलात्कार केल्याचा गुन्हा नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.
या गुन्ह्यात खरात उर्फ कॅप्टन याला नाशिक पोलिसांनी अटक केली आहे. नाशिक पोलिसांनी 58 व्हिडिओ जप्त केल्याचे सांगतले आहे. या व्हिडिओमध्ये नामांकित महिला तसेच सेलिब्रिटी वरिष्ठ अधिकारी आणि काही राजकीय नेत्यांची माहिती मिळाली आहे. पोलिसांकडून या व्हिडिओची सखोल तपासणी सुरू आहे. या प्रकरणात भोंदूगिरी करणाऱ्या खरात उर्फ कॅप्टन यांची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केली आहे.
नाशिकमध्ये सरकारवाडा पोलिसांत संशयित अशोक खरात याच्याविरुद्ध अत्याचाराचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. 35 वर्षीय महिलेवर अत्याचार केल्याच्या आरोपाखाली अशोक खरात उर्फ स्वघोषित कॅप्टन याच्यावर कारवाई करण्यात आली आहे. आज पहाटे गुन्हे शाखेकडून भोंदूगिरी करणाऱ्या खरात उर्फ कॅप्टन याला ताब्यात घेण्यात आले आहे. त्याच्याकडून जप्त केलेल्या पेन ड्राइव्हमध्ये 58 अश्लील व्हिडीओ असून, त्याची सत्यता तपासली जात आहे.
नाशिकमधील सिन्नर तालुक्यात मिरगाव येथील श्री ईशान्येश्वर मंदिर ट्रस्टचा अध्यक्ष असलेला कॅप्टन अशोक खरात हा सेवानिवृत्त आहे. तो अंकशास्त्रज्ञ म्हणून ओळखला जातो. नोव्हेंबर 2022 मध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मिरगाव येथील मंदिरात भेट दिल्यानंतर अशोक खरात चर्चेत आला होता. अनेक बडे राजकीय नेते, सेलिब्रिटी आणि उद्योजक त्याच्याकडे मार्गदर्शन घेण्यासाठी जात असतात. त्याचे खरे रुप समोर आल्यामुळे नाशिकमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणात अधिक तपास नाशिक गून्हे शाखा पोलिस करत आहेत.