33.8 C
Gondiā
Monday, June 29, 2026
Home गुन्हेवार्ता जिल्हाधिकाऱ्यांच्या बनावट लेटरहेडचा वापर करून ४ कोटींची फसवणूक; मुख्य सूत्रधार आशिष पिपरे...

जिल्हाधिकाऱ्यांच्या बनावट लेटरहेडचा वापर करून ४ कोटींची फसवणूक; मुख्य सूत्रधार आशिष पिपरे अटकेत

0
16
​गडचिरोली:जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नावाचा आणि लेटरहेडचा गैरवापर करून चक्क ४ कोटी रुपयांच्या विकासकामांच्या बनावट प्रशासकीय मान्यता (प्रमा) आदेश तयार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या गंभीर प्रकरणात गडचिरोली पोलिसांनी पहिली मोठी कारवाई करत, मुख्य संशयित आणि चामोर्शी नगरपंचायतीचा स्वीकृत नगरसेवक आशिष पिपरे याला रविवारी मध्यरात्री छत्रपती संभाजीनगर येथून बेड्या ठोकल्या आहेत. या कारवाईमुळे राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
​जिल्हाधिकाऱ्यांच्या बनावट लेटरहेडवर त्यांची हुबेहूब स्वाक्षरी करून, जिल्हा खनिज प्रतिष्ठान (DMF) निधीतून राबविण्यात येणाऱ्या विकासकामांसाठी खोटी प्रशासकीय मान्यता मिळवल्याचे दिसून आले आहे. प्रशासनाच्या सर्वोच्च स्तरावरील कागदपत्रांची फसवणूक झाल्याने हे प्रकरण अतिशय गंभीर मानले जात आहे.
​अटक करण्यात आलेला आशिष पिपरे हा चामोर्शी नगरपंचायतीचा स्वीकृत नगरसेवक असून, त्याची पत्नी भाजपची नगरसेविका आहे.​तीन महिन्यांपूर्वीच भाजपमधून त्याची हकालपट्टी करण्यात आली आहे.​भाजपमध्ये असतानाही त्याने काँग्रेसच्या कोट्यातून स्वीकृत नगरसेवक पद मिळवले होते.​सत्तापक्षातील अनेक बड्या नेत्यांशी त्याची जवळीक असल्याची चर्चा आहे.
​यापूर्वी एका माजी राज्यमंत्र्याचा स्वीय सहाय्यक (PA) म्हणूनही त्याने काम केले आहे.​चामोर्शीत ‘अगरबत्ती प्रकल्पा’च्या नावाखाली महिलांची फसवणूक केल्याचे गंभीर आरोपही त्याच्यावर आहेत.​पिपरेच्या अटकेनंतर आता तपासाने वेग घेतला आहे. पोलीस आता या प्रकरणातील ‘बनावट कागदपत्रांचे जाळे’ शोधून काढण्याचा प्रयत्न करत आहेत.