‘जेएसव्ही’ संचालकांच्या मालमत्तेची विक्री होणार

0
16

भंडारा,,दि.९ :जे.एस.व्ही. डेव्हलपर्स इंडिया कपंनीच्या नावाने असलेली संपत्ती विक्री करून ठेवीदारांची रक्कम लवकरात लवकर देण्यात यावी, असे शासनाचे ओदश प्राप्त झाले असून तात्काळ कार्यवाही करून ठेवीदाराची रक्कम परत करण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.
जे.एस.व्ही. डेव्हलपर्स इंडिया लि. व जय विनायक बिल्डकार्प या कंपनीच्या संचालकांनी भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, नागपूर जिल्ह्यातील लोकांना तीन वर्षात, चार वर्षात रक्कम दुप्पट करून देण्याचे आर्थिक प्रलोभन देऊन २५ हजार कोटींची फसवणूक केली. ठेवीदारांनी सामाजिक कार्यकर्ता विष्णुदास लोणारे यांच्या नेतृत्वात आंदोलन सुरू केले. त्यानंतर संचालकाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला. त्यात पाच संचालकांना अटक करण्यात आली. त्यातील दोन संचालक आजही कारागृहात आहेत. परंतु ठेवीदाराची रक्कम मिळत नसल्याने कंपनीच्या संचालकाच्या नावाने असलेली संपत्ती जप्त करण्यात यावी व ठेवीदाराची रक्कम परत करण्यात यावी म्हणून नागपूर हिवाळी अधिवेशनावर मोर्चा काढण्यात आला होता. त्याची दखल शासनाने घेतली असून कपंनीच्या संचालकांच्या नावाने असलेली भंडारा, गोंदिया, ब्रम्हपुरी, बोटे येथील मालमत्ता जप्त केली आहे. या सर्व मालमत्तेवर नियंत्रण ठेवण्यासाठी अप्पर जिल्हाधिकारी भंडारा यांची सक्षम प्राधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. असे आदेश उपसचिव गृहविभाग यांनी दिले आहे.