बुधवारला क्रांतीज्योती महात्मा फुले यांच्या १९१ व्या जयंती कार्यक्रमाचे आयोजन

0
21

गोंदिया,दि.०९ः- बहुजन क्रांती मोर्चा व इतर समविचारी सामाजिक संघटनांच्यावतीने येत्या बुधवार ११ एप्रिलला क्रांतीज्योती महात्मा ज्योतीराव फुले यांची १९१ वी जंयती विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून साजरी करण्यात येणार आहे.महात्मा फुले यांच्या जयंती महोत्सवाच्या निमित्त मानवतावादी बहुजन महामानवांच्या सयुंक्त जयंती महोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.येथील तहसिल कार्यालयासमोरील डॉ.बाबासाहेब आंबेडकर प्रतिमा चौकात सायकांळी ६ वाजता या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.या कार्यक्रमाचे उदघाटन अफज़ल शाह(विदर्भ छप्परबंद बिरादरी संघटन) यांच्या हस्ते होणार आहे.कार्यक्रमाला पाहुणे म्हणून सन्तोष खोब्रागड़े(ओबीसी सेवा संघ),महेंद्र कठाने(संचालक-आंबेडकरी संस्कार केंद्र),शिव नागपुरे( अवंतीबाई लोधी महासभा राष्ट्रीय कार्याध्यक्ष)
डॉ.धनराज बनकर(माळी समाज),पौर्णिमाताई नागदेवे(महिला सामाजिक कार्यकर्ता),समता गणवीर(सावित्रीमाई फुले महिला संघटन),ज़ुबैर खान(मुस्लिम समाज),विश्वजीत बागडे,राजकुमार रहांगडाले(बळीराजा मैत्रीय फाउंडेशन),व्ही.डी. ठाकरे(परमात्मा एक सेवक समाज) यांच्यासह विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून आदर्श शहारे, शुभम रामटेके, कु.चेतना रामटेककर उपस्थित राहणार आहेत.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारतीय बेरोजगार मोर्चा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष विक्की बेलखोडे राहणार आहेत.कार्यक्रमाचे प्रास्तविक बामसेपचे कार्याध्यक्ष राजेश मेश्राम करणार आहेत.या कार्यक्रमाला ओबीसी बहुजन समाजाच्या बांधवानी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन बहुजन क्रांती मोच्र्याचे सयोंजक अतुल सतदेवे,चंद्रकांत शहारे,अजय चौरे,राजेश बंसोड़,अरविंद शेंडे,चंदन धुवारे आदींनी केले आहे.