आठ तोतया शिक्षकांनी उचलले २५ लाखांचे कर्ज

0
6

गोंदिया,दि.7 : बजाज फिनसव्हर्स कंपनीच्या एका कर्मचाऱ्यांच्या मदतीने कर्जाची उचल करण्यासाठी आठ जणांनी स्वत:ला शिक्षक असल्याचे दाखवून त्यासाठी खोटे पगार पत्रक तयार केले. या खोट्या पगार पत्रकाच्या आधारे २५ लाख २९ हजारांची उचल करणाऱ्या त्या तोतया आठ शिक्षकांसह बजाज कंपनीच्या कर्मचाऱ्यांसह नऊ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गोंदिया येथील चांदणी चौकातील सारासार कॉम्प्लेक्स पोद्दार स्टीलजवळ दुसºया माळ्यावर बजाज फिनसव्हर्स कंपनीचे आॅफिस आहे. येथे उमेश जांभूळकर नावाच्या व्यक्तीने आठ लोकांना कर्ज मिळवून देण्यासाठी त्यांना तोतया शिक्षक बनविले. यासाठी त्याने खोटे पगार पत्रक, ओळखपत्र व कागदपत्रे तयार केली. सप्टेंबर ते डिसेंबर २०१७ या दरम्यान हा प्रकार घडला.
गोंदियातील ललीत बलीराम अगाडे, राजेश सेवकराम राऊत, मनोज पोलीराम डोंगरे, लोकेश प्रभाकर ढोमणे, बबीता प्यारेलाल सोनवाने, भरतलाल चैनलाल पारधी, प्रशांतकुमार बिसेन कोचे, शिवलाल सूजरलाल मंडीये या आठ लोकांना आरोपी उमेश जांभूळकर यांनी शिक्षक असल्याचे दाखविले. त्यांचे खोटे पगार पत्रक तयार करुन जिल्हा मध्यवर्ती बँकेचे खोटे स्टेटमेंट व शाळेचे खोटे ओळखपत्र दाखवून बजाज फिनसव्हर्स कंपनीकडून २५ लाख २९ हजार रुपये रकमेच्या कर्जाची उचल केली. दरम्यान उचल केलेल्या कर्जाच्या रक्कमेचा आकडा अधिक असण्याची शक्यता वर्तविली जात आहे. यासंदर्भात राकेश विठ्ठलराव बनकर (३२) यांच्या तक्रारीवरुन गोंदिया शहर पोलिसांनी सदर आरोपीविरुध्द भादंविच्या कलम ४०६, ४२०, ४६५, ४६८, ४७१, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.