गळफास घेऊन गरोदर महिलेची आत्महत्या

0
9

तिरोडा,दि.11ः-तालुक्यातील वडेगाव येथे २७ वर्षीय गरोदर महिलेने राहत्या घराच्या खोलीत ओढणी बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना (दि.८) दुपारी ३.३0 वाजता सुमारासची आहे. वर्षा अजय बिंझाडे(२७) रा.वडेगाव मृत पावलेल्या महिलेचे नाव असून घडलेल्या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
तालुक्यातील वडेगाव येथील वर्षा बिंझाडे हिचा पती अजय बिंझाडे आजारी असून त्याला उपचाराकरीता रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सासू मानसिक आजाराने ग्रस्त आहे. तर काल दुपारी ३.३0 वाजता सुमारास वर्षा बिंझाडे हिने स्वत:च्या राहते घरी ओढनी बांधून गळफास घेतल्याची घटना उघडकीस आली. त्वरीत तिरोडा पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा करुन मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविले. मात्र, माहेरच्या कुटुंबीयांनी वर्षा बिंझाडे हिच्या अचानक झालेल्या मृत्यूला घेवून आरोप केल्याने गावात एकच खळबळ उडाली. यामुळे(दि.९) सायंकाळी ५ वाजता सुमारास शवविच्छेदन करुन मृतदेह कुटुंबियांच्या स्वाधीन करण्यात आले. मात्र, वषार्ने कोणत्या कारणावरुन गळफास घेतले. या घटनेची निश्‍चित माहिती कळू शकली नाही. फियार्दीच्या तक्रारीवरुन तिरोडा ठाण्यात घटनेचा र्मग दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस निरीक्षक संदिप कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.पोलिस निरीक्षक गवते, पोहवा अनिरुध्द बचेरे करीत आहेत.