25 C
Gondiā
Sunday, July 5, 2026
Home गुन्हेवार्ता अपसंपदेप्रकरणी कार्य.अभियंता राऊत यांच्यावर गुन्हा दाखल

अपसंपदेप्रकरणी कार्य.अभियंता राऊत यांच्यावर गुन्हा दाखल

0
153

गोंदिया,दि.३१ः- जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव येथील सार्वजनिक बांधकाम विभागातील तत्कालीन शाखा अभियंता व अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर येथील सार्वजनिक बांधकाम विभाग क्रमांक २ चे कार्यकारी अभियंता अशोक कचरुजी राऊत यांच्यासह पत्नी सौ.हंसलता राऊतवर(हल्लीमुक्काम चिचगड रोड देवरी) अपसंपदा धारण केल्याबद्दल लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्यावतीने देवरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.राऊत यांनी आपल्या नोकरी कार्यकाळातील १९९७ ते २०१७ या काळात पदाचा गैरवापर करुन ज्ञात उत्पन्नापेक्षा २७ लाख २० हजार ६७३ रुपयाची अपसंपदा धारण केल्याचे चौकशीत निष्पन्न झाल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही कारवाई पोलीस अधिक्षक रश्मी नांदेडकर,अप्पर पोलीस अधिक्षक राजेस दुद्दलवार यांच्या मार्गदर्शनात उपअधिक्षक रमाकांत कोकाटे,पो.हवा.राजेश शेंद्रे,नितिन रहागंडाले,राजेंद्र बिसेन,गिता खोब्रागडे,देवानंद मारबते यांच्या पथकाने केली.