गोंदिया,दि.04 – गोंदिया-चंद्रपूर रेल्वेमार्गावर गोंदियाकडून चंद्रपूरकडे जाणाऱ्या रेल्वेगाडीच्या धडकेत दोन हरणांचा मृत्यू झाल्याची घटना आज शनिवारला दुपारी ३ वाजेच्या सुमारास पिंडकेपार-हिरडामाली दरम्यान घडली. या अगोदर देखील ३ रानडुक्कर व ६ गायींचा याच रेल्वे मार्गावर मृत्यू झाल्याची घटना घडली होती.गोंदिया-चंद्रपूर हा रेल्वे मार्ग नागझिरा अभयारण्यातून जातो. हिरडामाली ते गोंगले रेल्वे स्थानकापर्यंत दाट जंगल परिसर असल्याने अनेकदा जंगली प्राणी रेल्वेरुळ ओलांडून ये-जा करत असतात. त्यामुळे रेल्वेच्या धडकेत अनेकदा वन्यजीवांचा मृत्यू होतो.गोरेगाव वनविभागाने घटनास्थळावरच पंचनामा करुन मृत हरीणांना जंगलातच गाडण्यात आले.




