
गडचिरोली,दि.१६ः-जिल्हा परिषदेतील विषय समितीच्या सभापती पदाच्या निवडणुकीनिमित्त देवरी येथे गेलेले भारतीय जनता पक्षाचे चार सदस्य एका चारचाकी वाहनातून गडचिरोलीला परत येतांना झालेल्या अपघातात जखमी झाल्याची घटना आज १६ जानेवारीला सकाळी ९.३० वाजताच्या सुमारासत कुरखेडा तालुक्यातील जांभूळखेडा-लेंढारी परिसरात घडली.जखमीमध्ये रमाकांत ठेंगरी, नामदेव सोनटक्के, संपत आडे व भाग्यवान टेकाम अशी सदस्यांची नावे आहेत.
आज गुरुवारी गडचिरोली जिल्हा परिषदेच्या विषय समित्यांच्या सभापतीपदाची निवडणूक होणार असल्याने त्यासाठी हे चौघेही एका कारने गडचिरोलीकडे येत होते. यावेळी एका उभ्या ट्रकला कारची धडक बसली. त्यात हे चौघेही जखमी झाले आहेत. त्यांच्यावर सध्या वैद्यकीय उपचार सुरू आहेत.झालेल्या जिल्हा परिषद सदस्यांमध्ये कुरखेडा कढोली जिल्हा परिषद क्षेत्राचे जिल्हा परिषद सदस्य भाग्यवान टेकाम ,वैरागड -मानापुर चे जिल्हा परिषद सदस्य संपत्ती आडे,विहीरगाव- किन्हाळा जिल्हा परिषद सदस्य रमाकांत ठेंगरी आणि चामोर्शी तालुक्यातील जिल्हा परिषद सदस्य नामदेव सोनटक्के हे गंभीररित्या जखमी झालेले आहेत.त्यांना गडचिरोली येथील जिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आलेले आहे.