मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या दूर व मुक्त अध्ययन संस्थेच्या स्थगित केलेल्या परीक्षेस आज सुरुवात झाली. आज अंतिम वर्ष व बॅकलॉगच्या परीक्षा घेण्यात आल्या, या परीक्षा सुरळीत पार पडल्या. या परीक्षेत एकूण १५२८ विद्यार्थ्यांपैकी १३०४ विद्यार्थ्यांनी यशस्वीपणे ऑनलाईन परीक्षा दिल्या.
आयडॉलच्या आज एकूण २१ पैकी १३ परीक्षा सकाळी १० पासून ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत घेण्यात आल्या. या सर्व परीक्षा ऑनलाईन पध्दतीने घेण्यात आल्या.
आज अंतिम वर्ष बीएस्सी आयटी सत्र ६, तृतीय वर्ष बीएस्सी कॉम्प्युटर सायन्स, एमएस्सी भाग २ गणित, आयटी व कॉम्प्युटर सायन्स या परीक्षा व अंतिम वर्षाच्या बॅकलॉगच्या बीए व बीकॉम, बीएस्सी आयटी आणि एमसीए या परीक्षा सुरु झाल्या.
Faculty | Students Enrolled | Students appeared | Attendance % |
Arts | 397 | 353 | 88.91 % |
Commerce | 337 | 266 | 78.93% |
Science & Technology | 794 | 685 | 86.27 % |