लक्ष्मणराव मानकर फॉर्मसी कॉलेजचा उत्कृष्ट निकाल

0
304

आमगाव,दि.05ः नुकताच फॉर्मसी अभ्यासक्रमाचा व्दितीय वषार्चा निकाल जाहिर झाला असून आमगाव तालुक्यातील लक्ष्मणराव मानकर इन्स्टीट्युट ऑफ फॉर्मसी कॉलेजचे निकाल १00 टक्के लागला आहे. महाविद्यालयातील कुलसुम अमील तिगाला या विद्यार्थिनीने ९६.५0 टक्के गुण घेवून जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकाविला आहे.
महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या फॉमर्सी अभ्यासक्रमाच्या परीक्षेत लक्ष्मणराव मानकर इन्स्टीट्युट ऑफ फॉर्मसी कॉलेज निकाल १00 टक्के लागला. अभ्यासक्रमाच्या परीक्षेत महाविद्यालयातून कु.कुलसुम तिगाला ९६.५0 टक्के गुण घेवून जिल्ह्यातून प्रथम क्रमांक पटकाविला आहे. त्याचप्रमाणे योग्यवती दमाहे ९५.५ टक्के गुणे घेवून तालुक्यात दुसरा, वंदना दसरिया हिने ९४.६ टक्के गुण घेवून तालुक्यात तिसरा क्रमांक पटकाविला आहे.
यशस्वी सर्व विद्यार्थ्यांचे भवभुती शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सुरेशबाबु असाटी, कार्यवाह माजी आमदार केशवराव मानकर, प्राचार्य डी.के.संघी, शिक्षक देवेंद्र बोरकर, महेंद्र तिवारी, अर्पणा शुक्ला, रितु रहांगडाले, दिक्षा खोब्रागडे व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांनी अभिनंदन केले आहे.