जळगावातील माजी महापौरांच्या मुलाची निर्घृण हत्या

0
251

जळगाव-येथील शिवाजीनगर- भागात रहिवासी असलेलले माजी महापौर अशोक सपकाळे यांचे चिरंजीव  राकेश अशोक सपकाळे यांचा रात्री ११:३० च्या सुमारास स्मशानभूमीच्या पुढे उस्मानिया पार्क जवळ अज्ञात व्यक्तींनी धारदार शस्त्राने वार करून निर्घृण हत्या – केल्याची घटना घडली आहे.”, याप्रकरणी शहर पोलिसांनी २ जणांना ताब्यात घेतले असल्याची माहिती मिळाली आहे.राकेश अशोक सपकाळे (वय २८) असे मयत तरुणाचे नाव आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून शहरात पुन्हा एकदा गुन्हेगारीने डोके वर काढले आहे. माजी महापौर अशोक सपकाळे यांचा मोठा मुलगा राजु उर्फ बाबू याचा गुरुवारी वाढदिवस होता. बँनर व फटाके आनुन भावाचा वाढदिवस साजरा करु असी तयारी आटपून राकेश अशोक सपकाळे, लहान भाऊ सोनु अशोक सपकाळे व गाडी चालक सलमान हे तिघेही रात्री ११ वाजता हॉटेल अशोका पॅलेस येथून घरी शिवाजीनगर येथे निघाले होते.शिवाजीनगरच्या स्मशानभूमीजवळ आल्यावर अज्ञात संशयित लाडू गँगच्या लोकांनी हल्ला चढविला. त्यावेळी राकेश याच्यावर मागून पुढून जबरदस्त वार झाल्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला तर सोनू सपकाळे याच्या हातावर वार होऊन जखमी झाला व चालक सलमान याने पण मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला.यावेळी सोनू सपकाळे यांची सोन्याची अंगठी व चेन घटनास्थळा वरुन गायब झाली असल्याची माहिती कळाली आहे.