राष्ट्रीय एकता दिवसानिमित्त निंबध स्पर्धा सुप्रिया मेश्राम प्रथम तर अभय पटले द्वितीय

0
54
गोंदिया :-  देशभरात नुकताच साजरा करण्यात आलेल्या राष्ट्रीय एकता दिवसाच्या निमित्ताने येथील नटवरलाल माणिकलाल दलाल महाविद्यालयाच्या पदव्युत्तर राज्यशास्त्र विभागातर्फे राष्ट्रीय एकता या विषयावर महाविद्यालयीन स्तरावर गूगल फॉर्म च्या माध्यमातून निंबध स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत सुप्रिया मेश्राम प्रथम तर अभय पटले याने द्वितीय क्रमांक पटकाविला.
स्वतंत्र भारताचे प्रथम गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरी केली जाते. पाचशे पेक्षा अधिक संस्थानाना जोडून एकसंघ भारत निर्माण करण्यात सरदार पटेल यांनी सचिव वी. पी. मेनन यांच्या सोबतीने मोलाची भूमिका बजावली. सरदार पटेल यांच्या जयंतीचे औचित्य साधून गोंदिया शिक्षण संस्थेचे मार्गदर्शक प्रफुल पटेल, अध्यक्षा वर्षा पटेल, सचिव राजेंद्र जैन, संचालक निखिल जैन यांच्या मार्गदर्शनात नटवरलाल माणिकलाल दलाल महाविद्यालयाच्या पदव्युत्तर राज्यशास्त्र विभागातर्फे राष्ट्रीय एकता दिवसानिमित्त राष्ट्रीय एकता या विषयावर महाविद्यालयीन स्तरावर गूगल फॉर्म च्या माध्यमातून निंबध स्पर्धा घेण्यात आली. स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सहभागी विद्यार्थ्यांनी गूगल फॉर्मच्या माध्यमातून आपले निंबध सादर केले. निकाल सुद्धा  झूम ऍप च्या माध्यमातून ऑनलाईन मीटिंग घेऊन घोषित करण्यात आला. निंबध परीक्षण प्रा. संजय जगणे यांनी केले. निंबध स्पर्धेत बी ए अंतिम वर्षाची विद्यार्थिनी सुप्रिया मेश्राम प्रथम तर द्वितीय क्रमांक बी ए प्रथम वर्षाचा अभय राधेश्याम पटले यांनी पटकाविला. विजेत्यांना प्राचार्या डॉ. शारदा महाजन, प्रा. सिद्धार्थ रामटेके यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी डॉ. एच पी पारधी, डॉ. के. बी. वासनिक, प्रा. घनशाम गेडेकर उपस्थित होते. यशवंत विद्यार्थ्यांचे नमाद महाविद्यालयाच्या प्राध्यापक तसेच कर्मचारी वृंदानी अभिनंदन केले. स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी प्राचार्या डॉ. शारदा महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. एच पी पारधी, डॉ. के बी वासनिक, डॉ. एस जे चौरे व प्रा. घनशाम गेडेकर यांनी परिश्रम घेतले.