मोहाडी दि. १३: महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ तालुका शाखा मोहाडीची कार्यकारिणी निवड सभा जिल्हाध्यक्ष मुबारक सय्यद यांचे अध्यक्षतेखाली गौरीशंकर वासनिक, गजानन गायधने, किशोर डोकरीमारे, प्रकाश महालगावे, अनिल गयगये, विठ्ठल गभणे यांच्या उपस्थितीत झाली.
यावेळी तालुका कार्यकारिणी गठित करण्यात आली. तालुका अध्यक्षपदी दिनेश गायधने, सरचिटणीसपदी बाळासाहेब आंधळे, कर्याध्यक्षपदी विलास बाळबुधे, कोषाध्यक्ष भगींदर बोरकर तसेच शिक्षकनेते म्हणून विठ्ठल गभणे व अनिल गयगये यांची एकमताने निवड करण्यात आली.
सभेला सोमेश्वर गिर्हेपुंजे, फंदू धुर्वे, परसराम बारई, नरेंद्र कोहाड, दिनेश चिंधालोरे, विजय रहांगडाले, राजकुमार चांदेवार, महादेव मोटघरे, धनंजय नागपुरे, वसंता लिल्हारे, नत्थुराम गायधने, डी.झेड. सराटे, संजीव गजभिये, रामा कुंभरे, मधू साठवणे, सचिन खटके, प्रकाश जाधव, हेमंत कावळे, बाळकृष्ण धकाते, संतोष चांदेवार, पंढरीनाथ कस्तुरे, रूमोद धकाते, रेखा घाटबांधे, स्नेहल पडोळे, मिनाझ शेख, जयलक्ष्मी साठवणे, राजू धुर्वे, रविंद्र गायधने, महादेव ठाकरे, राधेश्याम बांते, राजकुमार मेश्राम संघटनेचे आदी सदस्य यावेळी उपस्थित होते.