मंडळांच्या खर्चावर सीएची नजर

0
6

तर अध्यक्षाविरुद्ध होणार कारवाई

धर्मदाय आयुक्तांचे निर्देश : अध्यक्षांना पॅनकार्ड, ओळखपत्र बंधनकारक

भंडारा दि. १३: सार्वजनिक गणेशोत्सव व नवरात्रोत्सव तसेच इतर धार्मिक कार्यक्रमांसाठी जमा केलेल्या वर्गणीचा सदुपयोग होत नसल्याचे निरीक्षण उच्च न्यायालयाने नोंदविल्यानंतर धर्मदाय आयुक्त कार्यालयाने यंदाच्या गणेशोत्सवापासून गणेश मंडळाच्या अवास्तव खचार्ला लगाम घालण्यासाठी पावले उचलली आहेत. त्यानुसार धर्मदाय आयुक्तांकडे मंडळाच्या नोंदणीप्रसंगी अध्यक्ष व सचिवांना त्यांचे पॅनकार्ड व अन्य ओळखपत्र देणे बंधनकारक आहे. तसेच पाच हजारांवरील खर्चाचा तपशील आता सीए (सनदी लेखापाल) यांच्या माध्यमातून सादर करावा लागणार आहे.
सार्वजनिक उत्सवासह धार्मिक कार्यासाठी मंडळाकडून देणगी स्वरुपात मोठय़ा प्रमाणात वर्गणी गोळा केली जाते. मात्र ज्या उद्देशाने या वर्गणी गोळा केल्या जातात त्या मूळ उद्देशालाच मंडळांकडून फाटा देऊन वर्गणीचा दुरुपयोग होत असल्याचा आरोप करणारी याचिका उच्च न्यायालयात दाखल झाली होती. यावर निर्णय देताना उच्च न्यायालयाने धार्मिक कार्यक्रमाच्या नावाखाली जमा केलेल्या निधीचा गैरवापर टाळण्यासाठी मंडळाचे अध्यक्ष, सचिव यांनाच जबाबदार धरण्याचे निर्देश दिले होते. गणेश मंडळांना गतवर्षीचे हिशेबपत्रक व यंदाचे अंदाजपत्रक सादर करणे बंधनकारक आहे. धर्मदाय आयुक्तांकडे नोंदणी करताना यापूर्वीच्या परवानगी पत्राची छायांकित प्रत जोडावी लागेल.