मोरगाव वासीयांनी केला भावेश जनबंधुचा सत्कार

0
23

(प्रथम एज्युकेशन फाउंडेशनचा अभिनव उपक्रम)
अर्जुनी-मोर/ संतोष रोकडे- विभागीय आयुक्त कार्यालय नागपूर,, प्रादेशिक विद्या प्राधिकरण नागपूर व प्रथम फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने नागपूर विभागात 1 मे 2020 रोजी सुरु करण्यात आलेला ‘शाळेबाहेरची शाळा’या उपक्रमांतर्गत जि. प.वरिष्ठ प्राथमिक शाळा, मोरगाव येथील विद्यार्थी भावेश भीमराव जनबंधु या विद्यार्थ्यांची मुलाखत आकाशवाणी नागपूर केंद्रावर प्रसारित झाल्याने शाळा तसेच गावाच्या वतीने सदर विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला व त्या विद्यार्थ्यांचे सर्वांकडून अभिनंदनाचा वर्षाव करण्यात आला.
सदर कार्यक्रम आकाशवाणीच्या नागपूर  केंद्रावरून मंगळवार, गुरुवार, शनिवार या दिवशी सकाळी 10:35 वाजता प्रसारित होत असतो तसेच यु-ट्यूब लिंक ‘ न्यूज व एअर अप्लिकेशन’,प्रथम महाराष्ट्र अप्लिकेशन, या माध्यमाच्या माध्यमातुनऐकता येतो.इतर दिवशी व्हाट्सअप्प या माध्यमातून शाळेतील शिक्षक,पालक, अंगणवाडी सेविका,, स्वयंसेवक यांच्या सहकार्याने विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविले जातात..कोव्हिड-19च्या पार्श्वभूमीवर शाळा बंद असल्या तरी मुलांचे अभ्यास मात्र बंद होऊ नये म्हणून विभागीय आयुक्त डॉ. संजीवकुमार यांच्या प्रेरणेने हा आकाशवाणी कार्यक्रम सुरु करण्यात आला.
आतापर्यंत गोंदिया जिल्ह्यातील एकूण 32 विद्यार्थ्यांनी मुलाखती दिल्यात.सदर कार्यक्रम प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप डांगे, यांची प्रेरणा तसेच गोंदिया जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य तथा प्राथमिक शिक्षणाधिकारी राजकुमार हिवारे, गटशिक्षणाधिकारी आर.एल.मांढरे,नोडल अधिकारी तथा गटसाधन केंद्राचे विषयतज्ञ धोके, सत्यवान शहारे प्रथम एज्युकेशन फाउंडेशनचे जिल्हा समानव्याक अविनाश चतुरकर, भूषण निषाने,राजेश दुधारे यांचे मार्गदर्शनातून कार्यक्रमाचे नियोजन करून दि.13मे गुरुवारला सकाळी 10.35 वाजता प्रसारण करण्यात आले.
तालुक्यापासून अगदी 2 किमी अंतरावर असलेल्या मोरगाव सारख्या एका लहानशा गावातील शेतमजुरांच्या मुलांनी आकाशवाणीला दिलेल्या या मुलाखतीने शाळा, तसेच गावाची मान उंचावली आहे. गावच्या सरपंच विजया उईके, मुख्याध्यापिका रेखा गोंडाणे,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मुनेश्वर शहारे यांनी पुष्पगुच्छ देऊन सदर विद्यार्थांचा सत्कार केला .तसेच पदवीधर शिक्षक सु.मो भैसारे, विषयशिक्षक पुरुषोत्तम गहाणे, मोहन नाईक, वामन घरतकर, जितेंद्र ठवकर,अचला कापगते-झोडे, प्राची कागणे-ठाकूर , उमा राऊत आदींनी अभिनंदन केले.