प्रावीण्यप्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार

0
9

गोरेगाव दि.८: येथील पी.डी. रहांगडाले विद्यालय व कन्या कनिष्ठ महाविद्यालयात दहावी व बारावीच्या परीक्षेत प्रावीण्यप्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार स्मृतिचिन्ह व रोख रक्कम देऊन सत्कार करण्यात आला. अध्यक्षस्थानी संस्थाध्यक्ष पी.पी. येळे होते. अतिथी म्हणून प्राचार्य एच.डी. कावळे, सेवानवृत्त प्राचार्य पी.एफ. बघेले, पर्यवेक्षक वाय.आर. चौधरी, शीला बारापात्रे, रेवा रहांगडाले, सरपंच देवाबाई पटले, तुमेरसिंह बघेले व पालक वर्ग उपस्थित होता. बारावीच्या परीक्षेत कला विभागातून पूनम शहारे, योगिता कुर्वे, छाया लांजेवार व विज्ञान विभागातून अंकिता मेश्राम, अंजली बिसेन, किर्ती पारधी तसेच राज्यशास्त्र विषयात प्रथम आलेली निशा रणदिवे यांचा सत्कार करण्यात आला. तसेच दहावीच्या परीक्षेत प्रावीण्यप्राप्त प्रीती ठाकुर, देवेश्‍वरी पारधी, प्राची पटले, वर्षा चौधरी, देवाशिष तुमसरे या विद्यार्थ्र्यांचा स्मृतिचिन्ह व रोख रक्कम देऊन सत्कार करण्यात आला. सोहळ्यात डॉ. ज्ञानीराम देशमुख, बी.डी. पटले, डी.डी. रहांगडाले, प्राचार्य पी.एफ. बघेले, प्रा. सी.आर. बिसेन, प्रा.एस.एम. नंदेश्‍वर, प्रा. डी.एम. राठोड यांच्यातर्फे स्मृतिचिन्ह व रोख बक्षीस देण्यात आले. संचालन प्रा.सी.आर. बिसेन व ए.एच. कटरे यांनी केले. आभार एम.डी. रहांगडाले यांनी मानले.