शिक्षक समिती जिल्हाच्या वतीने नवनियुक्त शिक्षणाधिकारी के.वाय.सर्याम यांचा सत्कार

0
44

सडक अर्जुनी::-(महेंद्र टेंभरे):–महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती जिल्हा गोंदियाच्या वतीने शिक्षक समितीचे वरिष्ठ नेते मनोजकुमार दिक्षित यांच्या अध्यक्षतेखाली नवनियुक्त शिक्षणाधिकारी के.वाय.सर्याम यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी शिक्षकांच्या मागण्यासंदर्भात चर्चा केली असता प्राधान्याने प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यात येतील असे आश्वासन शिष्टमंडळाला दिले.

यावेळी शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष किशोर डोंगरवार,जिल्हासरचिटणीस संदीप मेश्राम, कार्याध्यक्ष डी. एच.चौधरी, संचालक एन.बी.बिसेन, संचालक संदीप तिडके आणि सर्व जिल्हा, तालुकाध्यक्ष पदाधिकारी उपस्थित होते. जिल्हयातील शिक्षकांच्या विविध समस्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी शिक्षकांचे वेतन 1 तारखेला करणे,6 आँगष्टचा एकस्तर वसूली व मूळवेतनावर वेतननिश्चिती करण्यासंदर्भात अन्यायकारक पत्र रद्द करून जोपर्यंत चटोपाध्याय मंजूर होत नाही तोपर्यंत एकस्तर सूरु करण्यासंदर्भात पत्रक नव्याने काढण्याचे आश्वासन शिक्षणाधिकारी यांनी दिले.सोबतच गटशिक्षणाधिकारी यांचेकडून हमिपत्र घेवून 100% पात्र शिक्षकांना चटोपाध्याय व निवडश्रेणीचा लाभ देणे,उच्च न्यायालय यांचे आदेशानुसार विभागीय आयुक्त यांचे पत्रानूसार 7 व्या वेतन आयोगानुसार कमालमर्यादेत 1500/ नक्षलभत्ता व अतिरिक्त घरभाडे भत्ता अदा करणे,प्रत्येक महिन्यात उच्च परिक्षा परवानगी,हिंदी, मराठी सूट व संगणक सूट यादी प्रकाशित करणे,सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे निवृत्त तारखेच्या दिवशीच सेवानिवृत्ती प्रकरण मंजूर करून सर्व लाभ व देयके अदा करणे, वैद्यकीय प्रतिपूर्ती देयक प्रस्ताव विनाविलंब मंजुरीकरिता आरोग्य विभागास सादर करणे, विषय पदवीधर शिक्षकांना सरसकट पदवीधर शिक्षक वेतनश्रेणीचा लाभ देणे; रिक्त असणारी हायस्कूल शिक्षक, केंद्रप्रमुख, उच्चश्रेणी मुख्याध्यापक पदवीधर विषय शिक्षक सर्व पदे पदोन्नतीने प्राथमिक शिक्षकांमधून तात्काळ भरणे आदी प्रश्नासंदर्भात शिक्षणाधिकारी यांचे सोबत चर्चा केली असता प्राधान्याने सर्व प्रश्न निकाली काढण्यात येतील असे आश्वासन नवनियुक्त शिक्षणाधिकारी यांनी शिष्टमंडळाला दिले.त्यानंतर शिक्षक समितीच्या वतीने जिपिएफ/डिसिपिएस व सेवानिवृत्त संदर्भातील प्रकरणे विनाविलंब निकाली काढत असल्याबाबत मुख्य लेखा व वित्त अधिकारी अश्विन वाहने यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आला. यावेळी समितीच्यावतीने काही शिक्षकांना 2015 पासून जीपीएफ पावती मिळाली नसल्याची बाब निदर्शनास आणून दिली असता तत्काळ गटशिक्षणाधिकारी यांच्याशी पत्रव्यवहार करून ज्या शिक्षकांना अजून पर्यंत पावती मिळाली नाही त्यांची माहिती मागवीली जाईल सोबतच समोरच्या आठवड्यामध्ये मार्च 2020 पर्यंतचा जीपीएफ चा हिशोब पावत्या सह शिक्षकांना देण्याचे आश्वासन शिक्षणाधिकारी यांनी दिले, यावेळी संगणक उत्तीर्ण नसलेल्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांकडून स्पष्ट शासन आदेश असतानाही संगणक वसुली केल्याची बाब निदर्शनास आणली असता शासन निर्णयाचा अभ्यास करून केलेली संगणक वसुली परत करण्याचे आश्वासन दिले यावेळी शिक्षकांच्या इतर विविध समस्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. मुख्य लेखा व वित्त अधिकाऱ्यांनी शिक्षकांच्या सर्व समस्यांचे लवकरच निराकरण करण्याचे आश्वासन दिले.संचालन उपाध्यक्ष वाय.आय .रहांगडाले यांनी केले तर आभार सरचिटणीस संदीप मेश्राम यांनी मानले

यावेळी कार्या.चिटणीस बी.एस.केसाळे, गोंदियाचे तालुकाध्यक्ष एस.डी.नागपुरे, कार्याध्यक्ष अनुप नागपुरे, देवरीचे तालुकाध्यक्ष .गजानन पाटणकर,गोरेगावचे तालुकाध्यक्ष डी.डी.बिसेन, रोशन मस्करे, मा.बी.बी.मेंढे,जनार्दन गिरीपुंजे , उमेश रहांगडाले , मा.टी. एम.शहारे ,सुशील पाऊलझगडे,अशोक बिसेन, राजू गाढवे,.दिलीप लोधी,नरेश मेश्राम,महेश कवरे,मंगेश पर्वते, प्रकाश गावडकर,खेत्रीदास भेंडारकर,सुभाष मानकर.विनोद कोसमे ,जीवन म्हसाखेत्री ,राजेंद्र बोपचे , दिलीप कुरुटकर तसेच शिक्षक समितीचे बहुसंख्येने पदाधिकारी उपस्थित होते