तालुक्यातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

0
66

एकोडी : पंचायत समिती तिरोडा अंतर्गत वरिष्ठ प्राथमिक शाळा सेजगाव येथील गुणवंत विद्यार्थी राहुल पृष्वीराज पटले याचा आयोजित कार्यक्रमात आज (ता.२४) खंडविकास अधिकारी व गटशिक्षणाधिकारी यांच्या हस्ते प्रमाणपत्र देवून गौरव करण्यात आला.
जिल्हा परिषद शिक्षण विभाग प्राथमिकच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येतो. इयत्त आठवीमध्ये असलेल्या राहुल पटले यांनी वर्ष २०२०-२१ या शैक्षणिक वर्षात पंचायत समिती पातळीवर प्रथम क्रमांक पटकावले. त्या बद्दल त्याचा प्रशस्तीपत्र देवून सत्कार करण्यात आला. विशेष म्हणजे सेजगाव येथील वरिष्ठ शाळेचे मुख्याध्यापक तसेच शाळेतील शिक्षकांनी शाळेला दिलेली नदी दिशा व त्यामुळे विद्यार्थ्यांना लागलेली शिक्षणाची ओढ यामुळे या शाळेतील विद्यार्थ्याने प्रथम येवून शाळेचा गौरव वाढविल्या बद्दल मुख्याध्यापक सुरेश पटले, शिक्षक अरविंद उके, मनोज रहांगडाले, प्रकाश भालेराव, सरपंच कंठीलाल पारधी, उपसरपंच स्वप्नील महाजन तसेच शाळेतील सर्व शिक्षक तसेच ग्रामपंचायत, गावकरी तसेच शाळा व्यवस्थापन समितीकडून राहुलचे कौतुक केले जात आहे.