अगंणवाडी सेविकांनी भ्रमणध्वनी केले परत

0
79

गोरेगाव,दि.24ः- शासनाने आभासी कामासाठी अंगणवाडी सेविकांना दिलेले भ्रमणध्वनी कुचकामी ठरले. त्याची वाँरटीसुद्धा आता संपली आहे. भ्रमणध्वनी बंद पडणे, डिसप्ले जाणे असे प्रकार नेहमीच घडत असून कामात अडथळा येत आहे. तसेच बिघलेल्या संचाच्या दुरुस्तीचा भुर्दड अंगणवाडी कर्मचार्‍यांनाच सोसावा लागत आहे. या प्रकारामुळे त्रासलेल्या अंगणवाडी कर्मचार्‍यांनी आज 24 रोजी स्थानिक बालविकास प्रकल्प कार्यालयात तालुक्यातील  अंगणवाडी सेविकांनी आपले भ्रमणध्वनी संच प्रकल्प अधिकारी चव्हाण यांच्याकडे जमा केले.
यावेळी आयटकचे राज्य उपाध्यक्ष हौसलाल रहागंडाले, जिल्हा उपाध्यक्ष विना गौतम,तालुका अध्यक्ष पुष्पा ठाकूर,तालुका सचिव भुमेश्वरी रहागंडाले,निवृत्ती मेश्राम,यशोदा पटले,लक्ष्मी फरदे,चरणदास भावे,रत्नमाला गेडाम,लता तुरकर,ओमेश्वरी हरिणखेडे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. प्रशासनाने यासंबंधात योग्य निर्णय न घेतल्यास येत्या 24 सप्टेंबर रोजी देशव्यापी संप करण्याचा निर्णय आयटकने घेतला आहे.