
गोंदिया,दि.26ःराजर्षी शाहू महाराज कृषी व्यवसाय व्यवस्थापन या महाविद्यालयाचा विद्यार्थी ललीत दिगंबर चौधरी यांने मशरुम शेती उत्पादनावर शेतकर्यांना मार्गदर्शन केले.कमी गुंतवणुकीत कसे अधिक उत्पादन घेता येईल याबद्दलही सविस्तर माहिती दिली.यावेळी मार्गदर्शक म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य व्ही.डी.ताराम,प्रा.बी.पी.मेश्राम,प्रा.बी.डी.पटले यावेळी उपस्थित होते.





