42.4 C
Gondiā
Sunday, June 7, 2026
Home विदर्भ सायटोला येथे गट्टूपाथ बांधकामाचे भूमिपूजन

सायटोला येथे गट्टूपाथ बांधकामाचे भूमिपूजन

0
35

blank

गोंदिया,दि.26ः तालुक्यातील गट ग्राम पंचायत सेजगाव (खुर्द) येथील सायटोला येथे बुधवार २५/०८/२०२१ ला भौतिक दृष्ट्या शाळेंचा विकास MREGS अंतर्गत जिल्हा परिषद शाळा सायटोला इथे गट्टूपाथ रस्ता कामाचे भूमिपूजन करण्यात आले.भूमिपूजन गोंदिया पंचायत समितीचे गटविकास अधिकारी दिलीप खोटेले यांच्या व तांत्रिक अधिकारी अरविंद के. पारधी यांच्या हस्ते करण्यात आले.प्रमुख उपस्थितीमध्ये सरपंच अर्चनाताई कंसरे,उपसरपंच प्रमोद पटले,सदस्य भरत टेकाम,संतोष पटले,सोनूताई चिखलोंढे,आशाताई चिखलोंढे,राकेश खरोले,रोजगार सेवक अमित नागपुरे,शाळेचे शिक्षक बिसेन,सामाजिक कार्यकर्ते मुनेश्वर चिखलोंढे,भक्तप्रल्हाद चिखलोंढे व इतर गावकरी उपस्थित होते.यावेळी गटविकास अधिकारी खोटेले यांनी विविध विकास कामानिमित्त मार्गदर्शन केले.तसेच विविध योजना द्वारे गावाची विकास कामे करता येतात यांबद्दल माहिती दिली.शाळेचे परीक्षण केले आणि कामे करण्याचे निर्देश दिले.

blank