ग्रामपंचायतीने केला गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्काऱ

0
32

गोंदिया,दि.29ः तिरोडा तालुक्यातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा सेजगाव येथील एन.एम.एस. परीक्षा सन २०२०-२१ मध्ये उत्तीर्ण झालेली साक्षी श्रीकृष्ण शरणागत या विद्यार्थिंनीचा सत्कार ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आला. विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची ओढ निर्माण व्हावी, हा त्या मागचा हेतु आहे.
इतर विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी म्हणून हा कार्यक्रम ग्रामपंचायत स्तरावर या पुढे करण्यात येईल, अशी ग्वाही सरपंच कंठीलाल पारधी यांनी दिली. आयोजित कार्यक्रमाचे संचालन अरविंद उके तर आभार प्रकाश भालेराव यांनी मानले. कार्यक्रम दरम्यान विद्यार्थिंनीचे स्मृती चिन्ह देऊन सत्कार करण्यात आले. यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राधेकिशन शरणागत, मुख्याध्यापक एस.एन. पटले, ग्रा.पं. सदस्य धु्रवकुमार फुकटकर, उपसरपंच स्वप्नील महाजन, शाळेतील शिक्षक मनोज रहांगडाले, एस.सी. रहांगडाले, टी. बी. पटले, आर.आर.बिसेन आदींनी परिश्रम घेतले.