अनिल देशमुखांना 100 कोटी वसुली प्रकरणात क्लिनचिट?CBI नं दिलं स्पष्टीकरण

0
145

मुंबई, २९ ऑगस्ट:-माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी अनिल देशमुख यांच्याविरोधात 100 कोटी रुपयांच्या खंडणी वसुलीचा आरोप केला होता. या आरोपानंतर आता CBI च्या प्राथमिक चौकशी अहवालात अनिल देशमुख यांना क्लिनचिट देण्यात आली असल्याचं वृत्त समोर आलं. यावर आता खुद्द सीबीआयनं पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

सीबीआयने प्रतिक्रिया देताना काय म्हटलं?

सीबीआयनं महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री आणि इतर अज्ञात लोकांच्या विरोधात नोंदवलेल्या प्रकरणाबाबत अनेक मीडिया प्रश्न प्राप्त झाले आहेत. हे लक्षात घेणं आवश्यक आहे की, या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या जनहित याचिकांच्या आधारे या प्रकरणी प्राथमिक चौकशी करण्याचे आदेश न्यायालयाकडून देण्यात आले होते.

या प्रकरणाची प्राथमिक चौकशी पूर्ण झाल्यावर सक्षम प्राधिकरणाने चौकशीदरम्यान गोळा केलेले पुरावे आणि कायदेशीर मत यावर आधारित नियमित केसची नोंदणी करण्याचे निर्देश दिले. सीबीआयने 21.04.2021 रोजी नोंदवलेली एफआयआर 24.04.2021 पासून सीबीआयच्या वेबसाइटवर उपलब्ध आहे. या प्रकरणाचा तपास सुरू आहे असं म्हटलं आहे.

प्राथमिक अहवालात क्लीनचिट?

तसंच उपअधीक्षक आर.एस. गुंजाळ यांनी हा अहवाल सादर केला आहे. या अहवालात देशमुख यांच्याविरुद्ध एकही पुरावा मिळाला नसल्याचं म्हटलं आहे आणि म्हणूनच चौकशी बंद करण्यात येत असल्याचं अहवालात नमूद करण्यात आलं आहे. त्यामुळे सीबीआयच्या प्राथमिक अहवालात देशमुख यांना क्लिनचिट मिळाली असल्याचं बोललं जात आहे.