मुख्याध्यापकांचे ५५ वे राज्यस्तरीय अधिवेशन १२ व १३ डिसेंबरला

0
6

चंद्रपूर,दि. १६-माध्यमिक शाळा मुख्याध्यापकांचे ५५ वे राज्यस्तरीय अधिवेशन(सम्मेलन) दिनांक १२ व १३ डिसेंबर २0१५ या कालावधीत येथील राजीव गांधी अभियांत्रिकी महाविद्यालयात आयोजित करण्यात आले आहे. या अधिवेशनाकरिता पश्‍चिम महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भातून जवळपास २५00 मुख्याध्यापक बंधू-भगिनी सहभागी होणारअसल्याची माहिती चंद्रपूर-गडचिरोली जिल्हा मुख्याध्यापक संघाचे संयोजक नरेंद्र बोबडे, चंद्रपूर व प्राचार्य संजय नार्लावार, गडचिरोली यांनी प्रसिध्दी पत्रकातून दिली.
दोन दिवस चालणार्‍या या अधिवेशनाला महाराष्ट्र राज्य मंत्री मंडळातील प्रमुख मंत्री, केंद्रीय मंत्री, खासदार, आमदार, शिक्षक आमदार, शिक्षण सचिव, शिक्षण संचालक, शिक्षण उपसंचालक व शिक्षणाधिकारी यांना आमंत्रित करण्यात आले आहे. ५५ वे राज्यस्तरिय मुख्याध्यापकांचे अधिवेशन अखिल महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक शिक्षक संयुक्त मंडळ व विदर्भ माध्य. व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ यांचे संयुक्त विद्यमाने चंद्रपूर-गडचिरोली जिल्हा मुख्याध्यापक संघद्वारा आयोजित करण्यात आले असून मुख्याध्यापक संयुक्त मंडळाचे व्यवस्थापक अध्यक्ष रावसाहेब आवारी, राज्याचे अध्यक्ष मारोती खेडेकर, सचिव नंदकुमार बारवकर, विदर्भाचे अध्यक्ष शत्रृध्न बिरकर, सचिव सतिश जगताप कार्याध्यक्ष अशोक पारधी, पश्‍चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष भागचंद्र अवताडे पाटील, सचिव प्रमोद नेमाडे, मराठवाड्याचे अध्यक्ष युनूस पटेल, सचिव दिलीप दुभाळ, चंद्रपूरचे नामदेवराव बोबडे, मदन ठेंगणे, कवडूजी वैलथरे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली संमेलनाकरिता विविध समित्यांचे गठण करण्यात आले असून सम्मेलनाची स्मरणिका सुध्दा प्रकाशित केली जाणार आहे. याकरीता स्वतंत्र समिती गठित करण्यात आली आहे. 
या अधिवेशनात शिक्षण क्षेत्रातील नवनवीन अध्यादेश, २८ ऑगस्टचा घातक अध्यादेश, नव्याने शाळांना परवानगी न देणे, प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र, संच मान्यता, शिक्षक मान्यता, शिक्षक भरती, अनुदान पात्र ठरलेल्या शाळा व वर्गतुकड्यांना त्वरित वेतन अनुदान मंजूर करणे, अनुदानाकरीता ऑनलाईन मुल्यांकन झालेल्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना सरसकट अनुदानास पात्र घोषित करणे, वेतनेत्तर अनुदान, पुर्वीप्रमाणेच शिक्षक भरती प्रक्रिय सुरु ठोवणे आदि ठाराव अधिवेशनात घेऊन शासनाकडे कार्यवाहीकरीता पाठविण्यात येणार आहे. ५५ वे राज्यस्तरिय अधिवेशन यशस्वी होण्याकरीता संयुक्त मंडळाचे पदाधिकारी, विदर्भाचे पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली चंद्रपूर-गडचिरोली जिल्हा मुख्याध्यापक संघाचे श्रीधर फटाले, संजय नार्लेवार, राजु साखरकर, नरेंद्र बोबडे, तेजराम बोरकर, संजय भांडारकर तथा सदस्य मनिष शेट्ये, जयंत येलमुले, नरेंद्र कुकडावार, प्रभाकर डोंगरे, प्रदीप गर्गेलवार, प्रशांत दोंतूलवार यांनी सहकार्य केले. ल्ल