अनेक देश दहशतवादाला धोरण म्‍हणून राबवत आहेत-मोदी

0
9
वृत्तसंस्था
अंकारा (तुर्कस्तान) दि. १६ ”दहशतवादाचा वर्ण बदलत आहे. मात्र, अनेक देश दहशतवादाच्‍या जुन्‍याच संरचनेला आपले धोरण म्‍हणून राबवत आहेत, ” असे मत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्‍यक्‍त केले. रविवारी रात्री येथे झालेल्या ब्रिक्‍स नेत्यांच्या बैठकीत ते बोलत होते. ‘जी-20′ परिषदेसाठी मोदी येथे आले आहेत.
नव्याने विकसित होत असलेल्या अर्थव्यवस्थांवर लक्ष केंद्रीत करणे हा या बैठकीचा मुख्‍य उद्देश होता. मात्र, पॅरिसमध्‍ये झालेल्‍या दहशतवादी हल्‍ल्‍यानंतर यामध्‍ये दहशतवादाच्‍याच समस्‍येवर चर्चा होताना दिसत आहे.
विदेशातील काळ्या धनाला गोठवण्‍याचा सल्‍ला
ज्‍या देशाचे काळेधन विदेशात पडलेले आहे ते गोठवून ते त्‍या त्‍या देशाला द्यावे, असा सल्‍ला या संमेलनामध्‍ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला.