आनंद साधना संचालित टिम तरुणाई तर्फे आयोजित पर्यावरणपुरक मुर्तीकला कार्यशाळा

0
20

सहभागी जि. प. शाळा मांडवीच्या विद्यार्थ्यांचा शिक्षक दिनी प्रमाणपत्र देवून गुणगौरव

तुमसर : (दि. ५ सप्टेंबर)- तुमसर तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या मांडवी शाळेत ३ सप्टेंबर रोजी आनंद साधना बहुउद्देशिय सेवाभावी संस्था, हिवरा आश्रम (महा.) संचालित टीम तरुणाई तर्फे शाडू मातीपासून पर्यावरणपुरक मुर्तीकला कार्यशाळा संपन्न झाली. या कार्यशाळेत सहभागी २५ विद्यार्थ्यांचा ५ सप्टेंबरला शिक्षक दिनाचे औचित्य साधून मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देवून गुणगौरव करण्यात आला.
शाडू मातीपासून गणपती व इतर मुर्ती बनवण्याचे प्रत्यक्ष प्रात्याक्षिक तथा पर्यावरणविषयक जनजागृतीपर महत्वपूर्ण माहिती मुख्य प्रशिक्षक तथा संस्थेचे पर्यावरण राज्य समन्वयक शिवा इंगळे अकोला, प्रशिक्षक तथा प्रकल्प समन्वयक समाधान रिंढे बुलढाणा यांनी दिले तर यवतमाळ जिल्हा समन्वयक प्रदिप भड, भंडारा जिल्हा समन्वयक पुजा निखाडे, लाखनी तालुका समन्वयक अपूर्वा भुरे व स्वयंसेवक गणेश खेडकर अकोला यांनी मोलाचे योगदान दिले. यावेळी मांडवी शाळेचे उपक्रमशील शिक्षक दामोधर डहाळे यांचे विशेष सहकार्य लाभले. सहभागी विद्यार्थ्यांनी कार्यशाळेत शाडू मातीपासून गणपतीची तसेच घरीसुद्धा अभिनव पद्धतीने इतरही मुर्त्या बनवल्या हे विशेष.
सदर उपक्रमात सहभागी विद्यार्थ्यांना टीम तरुणाई तर्फे शाव्यस अध्यक्ष रविन्द्र सरोदे यांच्या अध्यक्षतेखाली तसेच समूह साधन केंद्र तुमसर येथील विशेष शिक्षक चंद्रशेखर मते, मुख्याध्यापक पी. डी. राऊत, पद. शिक्षिका के. डी. पटले, सहा. शिक्षक एन. जी. रायकवार व दामोधर डहाळे यांच्या उपस्थितीत सहभाग प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इ. ७ वी च्या राणु मते हिने केले तर इ. ७ वी च्या वेदिका ढबाले हिने सर्वांचे आभार मानले.