शिक्षणाच्या माध्यमातून या देशात थोर व्यक्तींचा उदय – पशुसंवर्धन मंत्री सुनिल केदार

0
18

नागपूर, दि. 5 : देश स्वतंत्र झाला त्यावेळेस शिक्षणाच्या अभावी हा देश चालेलच कसा असा प्रश्न जगातील सगळ्या विद्वानांना पडला होता. शिक्षणाच्या माध्यमातूनच या देशात थोर व्यक्ती उदयास आले आणि या देशाला जागतिकस्तरावर महत्त्वाचे स्थान मिळवून दिले, असे प्रतिपादन पशुसंवर्धन, दुग्धविकास व्यवसाय, क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनिल केदार यांनी आज गौरव शिक्षक पुरस्कार समारंभात दिले.

डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा परिषदेच्यावतीने शिक्षकांना आदर्श शिक्षकांचा गौरव करण्याकरिता आबासाहेब खेडकर सभागृह येथे पुरस्कार सोहळयाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष रश्मी बर्वे, जिल्हा परिषदेच्या शिक्षण सभापती भारती पाटील, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यपालन अधिकारी कमलकिशोर फुटाणे, शिक्षणाधिकारी चिंतामण वंजारी तसेच जिल्हा परिषदेचे सभापती, अधिकारी व कर्मचारी वर्ग उपस्थित होते.

आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरवण्यात आलेले प्राथमिक व माध्यमिक विभाग जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेतील शिक्षक श्रीमती सुजाता भानसे सोनेगाव (नि) नागपूर (ग्रामीण), विशेष शिक्षक दिव्यांग श्री. जितेंद्र धुर्वे सावंगा, विजय क्रिपाल नेरी मानकर हिंगणा, महेंद्र मेश्राम घोरपड कामठी, श्रीमती निलीमा राऊत तोंडाखैरी कळमेश्वर, शेषराव टाकळखेडे वलनी डफ्फर काटोल, उत्तम मनकडे सावरगांव क्र.1 नरखेड, चिंतामन ताजने पारडी रिठी सावनेर, संजय ढोके नयाकुंड पारशिवनी, श्रीमती संगिता चाके हमलापुरी रामटेक, रणजित बागडे किरणापूर मौदा, येशीराम राऊत बोथली ठाणा उमरेड, वसुंधरा किटकुले-धोटे कऱ्हांडला कुही, संजय दुर्गे मोखाळा भिवापूर, डॉ. यमुना नाखले वडंबा यांना मानचिन्ह, प्रमाणपत्र, रोखरक्कम, शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.प्रास्तविक चिंतामण वंजारी संचालन मंजुषा सावरकर आणि आभार प्रदर्शन श्री. बनसोड यांनी केले.