तीन दिवसात कसे गाठणार परीक्षेचे स्थळ,विद्यार्थी अडचणीत

0
82

गोंदिया,दि.10— बहुजन कल्याण मंत्रालयांतर्गत येत असलेल्या महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था(महाज्योती)मार्फत  UPSC/MPSC च्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन मोफत प्रशिक्षण देण्याचे ठरविले होते.त्यासाठीच्या इच्छुक उमेदवारांची राज्यस्तरीय छानणी परीक्षा 13 सप्टेंबर रोजी राज्यातील विविध केंद्रावर होणार असल्याचे 9 सप्टेंबरला जाहिर केले.मात्र तीन  3 दिवसात विद्यार्थ्यांनी दिल्ली,पुणे,मुंबई सारख्या ठिकाणाहून येऊन परीक्षा द्यायची आहे. कोणतीही परीक्षा घेण्यासाठी कमीत कमी 1 महिन्याचा कालावधी द्यावा लागतो.मात्र या परिक्षेच्या जाहीर झालेल्या तारखेवरुनही महाज्योतीचा मनमानी कारभार आताही सुरु झाल्याची टिका विद्यार्थी,संचालक व ओबीसी संघटनाकंडून होऊ लागली आहे.महाज्योती कडून निर्धारीत गटातील इच्छुक उमेदवारांना युपीएससी व नागरी गटातील परीक्षासांठी प्रशिक्षण देण्यासाठी अर्ज मागविण्यात आले होते.यासाठी मोठ्या संख्येने अर्ज प्राप्त झाले.त्यामुळे महाज्योतीने चाचणी परीक्षा घेण्याचे ठरवून 13 सप्टेंबर ही तारीख जाहीर करुन विद्यार्थ्यांच्या अचडणीत अजून वाढ केली आहे.9 सप्टेंबरपासून महाज्योतीच्या संकेतस्थळावरुन प्रवेश पत्र डाऊनलोड करुन घ्यावे असे आवाहनही करण्यात आले आहे.या आडमुठे धोरणामुळे विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा मानसिक संताप होऊ लागला आहे.

👍👍👉👉 महाज्योतीचा भोंगळ कारभार

कोणतीही परिक्षा घेण्यासाठी कमीत कमी 1 महिन्याचा कालावधी द्यावा लागतो.त्यातच युपीएससी चाचणी परीक्षेविषयी 16 आँगस्टला महाज्योतीच्या संचालकाच्या बैठकीत चर्चा होऊन 28 आँगस्टला परिक्षा घेण्याचे नियोजित होते.तरीही परीक्षा घेण्यात आली नाही.आता मात्र अचानक तारखेची घोषणा करण्यात आली. त्यातही जवळपास महाराष्ट्रातील 2000 विद्यार्थी अभ्यासासाठी दिल्लीत वास्तव्यास आहेत आणि त्यांची नागरी सेवा पूर्व परीक्षा फक्त महिन्याभरावर आहे तेव्हा ह्या विद्यार्थ्यांना तातडीने येऊन परीक्षा देणे कितपत योग्य आहे. यात त्यांचा 3 ते 4 दिवसाच्या अभ्यासाचा नुकसान होणार नाही का ? असा प्रश्न्ही उपस्थित केला जात आहे.युपीएससी नागरी सेवा परीक्षा  ऑक्टोबर मध्ये असल्याने ही परीक्षा 10 आँक्टोंबर नंतरच घ्यायला पाहिजे असे विद्यार्थ्यांचे म्हणने आहे.
या प्रशिक्षणात  फक्त ऑनलाइन वर्ग आहेत कुठलेही विद्यावेतन भेटणार नाही.2022 साठी नवीन बँच सुरू करणे योग्य नाही.कारण 2022 ची पूर्व परीक्षा 5 जून 2022 घोषित झाली आहे त्यासाठी जवळपास सर्वच विद्यार्थ्यांनी खाजगी प्रशिक्षण व अथवा त्यापद्धतीने अभ्यास सुरू केला आहे. त्याऐवजी 2023 साठी नवीन बँच व 2021 व 2022 साठी मुख्य परीक्षेचे प्रशिक्षण देणेच योग्य ठरेल.