एकलव्य निवासी शाळेसाठी अर्ज आमंत्रितM;25 सप्टेंबर पर्यंत अर्ज करावे

0
36

भंडारा,दि.21:- एकलव्य निवासी शाळा खैरी परसोडा नागपूर व बोरगाव बाजार देवरी जि. गोंदिया येथे ऑनलाईन पध्दतीने प्रवेश देण्याचे प्रस्तावित होते. मात्र शासनाच्या निर्देशानुसार प्रवेशपूर्व परीक्षा रद्द करुन विद्यार्थ्यांच्या मागील वर्षाच्या (शैक्षणिक वर्ष 2020-21) सत्रातील गुणांच्या आधारे विद्यार्थ्यांची गुणवत्तेनुसार निवड करण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने विद्यार्थ्यांनी प्रकल्प कार्यालयाच्या मार्फत 25 सप्टेंबर 2021 पर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प भंडारा निरज मोरे यांनी केले आहे.

            एकलव्य मॉडेल रेसिडेंशियल इयत्ता 6 वी वर्गात नवीन प्रवेश व इयत्ता 7 वी ते 9 वीच्या वर्गातील रिक्त जागा भरणे करिता हे अर्ज मागविण्यात येत आहेत. विद्यार्थ्यांनी आवेदन पत्र भरतांना वार्षिक परीक्षेच्या गुणांच्या आधारे एकुण प्राप्त गुणांची परिपूर्ण माहिती भरणे आवश्यक आहे. अर्ज भरण्यासाठी https://admission.emrsmaharashtra.com या संकेत स्थळाला भेट द्यावी.

            विद्यार्थी अनुसूचित जमातीचा, अदिम जमाती अदिवासी असावा. सन 2020-21 या शैक्षणिक वर्षात इयत्ता 5 वी व 6 वी ते 8 वी चे वर्गात मान्यता प्राप्त शाळेत शिक्षण घेणारा असावा. पालकाचे उत्पन्न सरासरी एकत्रित सहा लाख रुपयांच्या आत असावे, सोबत दाखला जोडवा. विद्यार्थ्यांनी शिकत असलेल्या शाळेचे बोनाफाईड प्रमाणपत्र जोडावे. सक्षम अधिकाऱ्यांकडील प्राप्त विद्यार्थ्यांचे जातीचा दाखला अर्जासोबत जोडावा. अधिक माहिती करिता प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प भंडारा यांचे कार्यालयाशी संपर्क साधावा.