जिल्हा परिषद सदस्य डॉ. लक्ष्मण भगत यांची जि.प. मुंडीपार शाळेला भेट

0
89

गोरेगांव:- तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुंडीपार या शाळेस मुंडीपार जिल्हा परिषदेचे विद्यमान सदस्य डॉ. लक्ष्मण भगत यांनी सदिच्छा भेट दिली. शाळेत राबविल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांची पाहणी केली.
यावेळी शाळेतील मुख्याध्यापक एच.एस.बिसेन यांनी शाळेत राबवित असलेल्या आनंददायी शिक्षण,वर्गामध्ये वापरला जाणारा ज्ञानरचनावाद,शिस्तबद्ध नियोजन, आकर्षक व नियोजनबद्ध मुख्याध्यापक कार्यालय, विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध केलेली आणि नियोजनबद्ध मांडणी करून ठेवलेली शैक्षणिक साहित्य, शाळेच्या परिसरात उभे केलेले हिरवेगार नंदनवन, डोळ्यात भरणारा शाळेचा स्वच्छ, सुंदर, रम्य असा शालेय परिसर आणि झाडे, वनस्पतींची विविधता याबाबत माहिती दिली.
शाळेत पिण्याच्या पाण्यासाळी बोरवेल व शाळेत वर्ग खोल्याची आवश्यकता तसेच शाळेच्या मूलभूत गरजा विषयींच्या समस्या देखील मुंडीपार जिल्हा परिषद सदस्य डॉ. लक्ष्मण भगत यांच्या समोर मांडल्या.
त्याला तात्काळ प्रतिसाद म्हणुन विविध कार्यालयांशी संपर्क साधून त्याचा पाठपुरावा केला आणि या समस्या लवकरात लवकर सोडण्याबाबत आश्वासन दिले.
“जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये अशा तळमळीने काम करणाऱ्या आणि विद्यार्थ्यांसाठी सर्वांगीण शिक्षणाचा आग्रह धरणार्‍या मुंडीपार शाळेतील शिक्षकांचा अभिमान वाटतो, शाळेच्या सर्व समस्या सोडविण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य केले जाईल” असेही यावेळी जिल्हा परिषद सदस्य डॉ. लक्ष्मण भगत म्हणाले.
यावेळी सरपंच सुमेंद्र धमगाये, उपसरपंच जावेद(राजाभाई)खान,तंमुस अध्यक्ष गिरिश पारधी, माजी तंमुस अध्यक्ष नामदेव नेवारे,ग्रामरोजगार सेवक उमेंद्र ठाकुर, मुख्या.एच.एस.बिसेन,बि.ए.राहांगडाले, काठेवार सर,पटले सर कलपाथरी,गावड मॅडम, टेंभरे मॅडम, बिसेन मॅडम, राऊत मॅडम,बबलु भोंडे व विद्यार्थी आदी उपस्थित होते.