जवाहर नवोदय विद्यालय ६ वीच्या परीक्षेचे प्रवेशपत्र त्वरित डाऊनलोड करा   

0
14

वाशिम, दि. 21 (जिमाका) : येत्या ३० एप्रिल रोजी होणाऱ्या जवाहर नवोदय विद्यालयाच्या इयत्ता सहावीच्या प्रवेश परीक्षेचे प्रवेशपत्र दोन प्रतीत मुख्याध्यापकाची सही व शिक्का घेऊन विद्यार्थ्यांनी परीक्षेच्या दिवशी यायचे आहे. एक परीक्षा प्रवेशपत्र परीक्षा केंद्रावर जमा करायचे आहे.

            ज्या विद्यार्थ्यांनी अजूनपर्यंत प्रवेशपत्र डाऊनलोड केले नाही त्यांनी लवकरात लवकर प्रवेशपत्र डाऊनलोड करावे. प्रवेशपत्र काढण्यासाठी काही अडचण निर्माण झाल्यास विद्यालयाच्या ९९७५०५९६०३,८७८८८५९२७०,

९६०४५६७०९०,९४२१४९४३३७ आणि ९४२३७२२८११ या क्रमांकावर संपर्क साधावा. असे जवाहर नवोदय विद्यालयाचे प्राचार्य एस.डी. खरात यांनी कळविले आहे.