स्टार्ट -अप आणि नावीन्यता आधारित ज्ञान कार्यक्रम २५ ते २९ एप्रिल आणि २ ते ६ मे

0
20

वाशिम, दि. 21 (जिमाका) : कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाअंतर्गत स्थापन केलेल्या महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीमार्फत नाविन्यपूर्ण दृष्टिकोनांना आणि प्रयत्नांना प्रोत्साहन देऊन आणि महाराष्ट्रात नाविन्यपूर्ण उद्योगांसाठी पूरक वातावरण निर्माण करण्याचे उद्दिष्ट आहे. या दृष्टिकोनातून सिस्को लॉन्च पॅड यांच्या सहकार्याने भारताच्या टेक्नोप्रेनॅरशीप मालिकेच्या महाराष्ट्र आवृत्तीचे आयोजन करीत आहे. त्यानुसार सुरुवातीच्या टप्प्यात तरुण विद्यार्थ्यांसाठी स्टार्टअप, व्यवसाय उद्योजकांसाठी आधारित विज्ञान सत्र आयोजित करण्यात येत आहे. जिल्ह्यातील नवोदित आणि स्टार्ट-अप्सना त्यांची कल्पना कशी तयार करावी, टिकून ठेवावी, विस्तारीत व्हावी. आणि त्याचे स्वरुप मोठे कसे कसे करता येईल याचे ज्ञान दिले जाणार आहे. तसेच या कार्यक्रमात उत्पादन विकास, डिझाईन विचार, तंत्रज्ञान व आर्थिक व्यवस्थापन व्यवसाय ज्ञानाचा एक भाग म्हणून निधी कसा उभारावा यासारख्या विविध विस्तृत विषयांचा समावेश आहे.

बिझिनेस सेशनचे सत्र 25 एप्रिल रोजी डिझायनिंग थिंकींग, 26 एप्रिल रोजी प्रॉडक्ट डेव्हलपमेंट, 27 एप्रिल रोजी क्रिएटिव्ह ॲन्ड सेफगार्डींग आय.पी. 28 एप्रिल फायनान्स फंडामेंटल्स आणि 29 एप्रिल रोजी फंड रेझिंग तर टेक्नोलॉजी सेशनचे सर्व सत्र सायंकाळी पाच ते सहा वाजता दरम्यान आयोजित करण्यात येणार आहे. 2 मे रोजी ए.आय व एम.एल. 3 मे रोजी एंटरप्राइझ क्लाऊड सोल्यूशन्स- मेराकी, 4 मे रोजी सिस्को डिजिटायझेशन अँड सेक्युअरर्स ओ.टी. एन्व्हायरमेंट, 5 मे रोजी आय.ए.सी. ॲन्ड हायब्रीड क्लाऊड आणि 6 मे रोजी ब्लॉक-चेन या सत्राचे आयोजन करण्यात करण्यात येणार आहे.

या विविध सत्रात सहभागी होण्यासाठी https://cs.co/CLAPMAHARASHTRA या संकेतस्थळावर विनाशुल्क पूर्व नोंदणी करणे अनिवार्य आहे. या माध्यमातून विविध सत्रात सहभागी होता येईल. तसेच यासंबंधीच्या अधिक माहितीकरीता [email protected] या ई-मेलचा वापर करावा. असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहाय्यक आयुक्त, सुनंदा बजाज यांनी केले आहे.