छत्रपती शिवाजी हायस्कूलची सुचाली आकाशवाणीवर झळकणार

0
82

चिचगड- छत्रपती शिवाजी हायस्कूल संलग्न कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय देवरी येथील विद्यार्थिनी कु. सुचाली रमेश बिंझलेकर इयत्ता आठवी हिची निवड ” शाळेबाहेर ची शाळा” या उपक्रमात अंतर्गत २९८ व्या भागासाठी झालेली आहे. ऋतूची माहिती व ऋतूत घडणाऱ्या घटना या अनुषंगाने कोणत्या ऋतूत कपडे लवकर वाळतात व का? तसेच उन्हाळा, हिवाळा व पावसाळा या ऋतूत कोणते कपडे वापरतात? यातील वैज्ञानिक कारण कोणते? या विषयाला अनुसरून मुलाखत आकाशवाणी नागपूर यांनी दि.२८/४/०२२ला घेतली.ही मुलाखत लवकरच आकाशवाणी च्या नागपूर केंद्रावरून प्रसारित होणार आहे.
विभागीय आयुक्त नागपूर यांच्या प्रेरणेने व प्रादेशिक विद्या प्राधिकरण नागपूर आणि प्रथम फाऊंडेशन तर्फे राज्यभरात कोरोना काळात मुलांच्या शिक्षणात खंड पडू नये व विद्यार्थी आपल्या घरी राहून स्वयंअध्ययन करतील या उद्देशाने शाळेबाहेर ची शाळा हा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी उपक्रम राज्यभर घेण्यात येत आहे.या उपक्रमा अंतर्गत वर्गनिहाय दर आठवड्याला विशिष्ट टास्क दिले जातात आणि त्यानुसार केलेल्या अध्ययन कृतीची माहिती सर्वांना व्हावी यासाठी विद्यार्थ्यांना आकाशवाणी वर बोलण्याची संधी मिळते. ही संधी यावेळी गटशिक्षणाधिकारी मा.मोटघरे साहेब व नोडल अधिकारी मा.मस्के सर यांच्या प्रेरणेने छत्रपती शिवाजी हायस्कूल देवरीला मिळाली. त्याअनुषंगाने सुचालीला विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाची मनमोकळेपणाने व सविस्तर अशी उत्तरे तिने दिली.
या उपक्रमासाठी केंद्र प्रमुख मा.भानारकर साहेब, विद्यालयाचे प्राचार्य .एम. जी. भुरे, विषय शिक्षक एस. टी. मेश्राम तसेच प्रथम एज्युकेशन फाऊंडेशनचे जिल्हा समन्वयक अविनाश चतूरकर व तिचे‌ आई- वडिल यांचे वेळोवेळी मार्गदर्शन लाभलेले आहे.