मुंबईतसुद्धा प्रो. राम मेघे कॉलेजचा डंका

0
12

मीनीच्युअर मॉडल मेकींग व टाऊन प्लानिंग स्पर्धेत मिळवले सर्वाधिक पुरस्कार

अमरावती :- प्रो. राम मेघे ईन्स्टीट्युट ऑफ टेक्नॉलॉजी एन्ड रीसर्च या कॉलेजचे प्राध्यापक आणि विद्यार्थी यांच्या परिश्रमामुळे आणि बुद्धीचातुर्यामुळे कॉलेजचे नाव सर्वदुर गाजते आहे. वीर जिजामाता टेक्नॉलॉजी ईन्स्टीट्युट मुंबई यांच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या विविध स्पर्धांमध्ये एकुण ४ पारितोषिकांवर प्रो. राम मेघे कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी आपले नाव कोरले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांवर कौतुकाचा वर्षाव होतो आहे.

दि. २३ आणि  २४ एप्रिलला व्हीजेआयटी मुंबईच्यावतीने मीनीच्युअर मॉडल मेकींग आणि टाउन प्लानींग या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. प्रो. राम मेघे कॉलेजमधील स्थापत्यशास्त्राच्या विद्यार्थ्यांनी यामध्ये आपला सहभाग नोंदवला होता. यामध्ये मीनीच्युअर मॉडल मेकींगचे द्वितीय आणि तृतीय तर टाऊन प्लानींगचे पहिल्या आणि तिसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक प्रो. राम मेघे कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी मिळवले आहे. मीनीच्युअर मॉडल मेकींगच्या पारितोषिकावर सचिन चाळीसगावकर, नरेंद्र भुयार, विनीत वासनकर, जयेश जमानेकर, स्वराज जगताप आणि चेतन काळे या विद्यार्थ्यांनी आपले नाव कोरले आहे. ज्यामध्ये रोख रक्कम १०,००० व ५००० रुपये विद्यार्थ्यांना बक्षिस म्हणून मिळाले.  तसेच टाऊन प्लानींगच्या पहिल्या पारितोषिकासाठी आदिती मांडवे, यशश्री देशमुख, समृद्धी पोकळे यांनी तर तिसऱ्या पारितोषिकासाठी सागर गंधे, रुद्रेश चाटे, रुग्वेद शेरेकर या विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले. ज्यामध्ये पहिल्या पारितोषिकाला रोख रक्कम ५००० व दुसर्‍या पारितोषिकास २००० रुपये देऊन विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले.

मुंबईच्या बाहेरुन आलेल्या स्पर्धकांमध्ये सर्वाधीक बक्षिसं प्रो. राम मेघे कॉलेजच्या विद्यार्थ्यांना मिळाले असल्यामुळे व्हीजेटीआयचा पहिल्या स्थापत्य कपनेसुद्धा प्रो. राम मेघे कॉलेजच्या विद्यार्थ्यांना गौरवण्यात आले. प्रा. राम मेघे कॉलेजच्या विद्यार्थ्यांच्या यशामुळे  केवळ अमरावतीचच नाही तर विदर्भाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे सर्वस्तरातुन कौतुक होते आहे. विविध पारितोषिकं मिळवल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आंनदाचे वातावरण बघायाला मिळाले. अनेक नवनविन गोष्टी आम्हाला या स्पर्धेदरम्यान शिकायला मिळाल्या असल्याचे विद्यार्थ्यांनी यावेळी सांगीतले. तसेच विद्यार्थ्यांनी या यशाचे श्रेय प्रो. राम मेघे कॉलेज ऑफ ईंजीनीयरींग, टेक्नॉलॉजी एन्ड रीसर्च चे प्राचार्य डॉ. ए. पी. बोडखे, स्थापत्य अभियांत्रीकी विभागाचे विभागप्रमुख डॉ. प्रकाश पजगाडे, प्रा. ऋषीकेश लंगोटे, प्रा. विक्रम गोहत्रे, प्रा.शशिकांत देशमुख, प्रा. तुषार दळवी  ,प्रा. मिलिंद मोहोड व स्ट्रक्चरल इंजिनियर अमित गिल्डा यांना दिले आहे