पी .डी.राहांगडाले विद्यालयाचा माजी विद्यार्थी नितीश upsc परिक्षेत उत्तीर्ण

0
154

गोरेगाव,दि.30ः येथील पी.डी.राहांगडाले विद्यालयाचा माजी विद्यार्थी नितीश दिलीपकुमार डोमळे यांने आज UPSC परीक्षेच्या जाहिर झालेल्या निकालात 559 रँक प्राप्त करीत यश संपादन केले आहे.नितीशची निवड आयएएस/आयपीएस करीता होणार आहे.नितीशचे आई वडील दोन्ही शिक्षक आहेत. वडील पी.डी.राहांगडाले विद्यालयाचे सेवानिवृत्त शिक्षक आहेत.त्यानी आपल्या यशाचे श्रेय आई वडील व विद्यालयातील मुख्याध्यापक व सर्व शिक्षकांना दिले आहे.नितिशने मिळवलेल्या यशाने ग्रामीण भागात शिक्षण घेतलेले विद्यार्थी सुद्धा जिद्द आणि कठीण परीश्रमातून देशाच्या सर्वोच्च परीक्षेत यश संपादन करू शकतात हे सिध्द केले आहे. विद्यालयाचे मुख्याध्यापक, पर्यवेक्षक व सर्व शिक्षकांनी नितीशचे घरी जाऊन अभीनंदन केले असून तालुक्यात त्याचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.