राज्यात १५ जूनपासून शाळा सुरू होणार

0
38

मुंबई– देशासह राज्यात पुन्हा एकदा कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. राज्यात बॉलिवूड सेलिब्रिटींपासून ते राजकीय नेत्यांपायर्ंत अनेकांना कोरोनाची लागण होत आहे. पुणे, मुंबई, ठाणे अशा मोठ्या शहरांमध्येही पुन्हा कोरोनाचा प्रसार होत आहे. असे असताना राज्यात पुन्हा एकदा नव्या शैक्षणिक वर्षांतगर्ंत येत्या १५ जूनपासून शाळा सुरु होणार आहेत. याच पार्श्‍वभूमीवर राज्यात शाळा पुन्हा बंद होणार की शाळा सुरुच राहणार यावर शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. शाळा बंद करणे चुकीचे असल्याचे गायकवाड म्हणाल्या आहेत.
सध्या कोरोना वाढत आहे त्यामुळे आम्हाला निश्‍चितच काही निर्णय घ्यावे लागतील. सध्या शाळा सुरु करणे गरजेचे आहे. या महिन्याच्या १५ तारखेला शाळा सुरु होतील. मागील दोन वर्षांचा अनुभव पाहता शाळा सुरु ठेवणे अवश्यक आहे. शाळा, शिक्षक, वही असं वातावरण असणं आवश्यक आहे. मागील दोन वर्षांमध्ये दुसरीची मुले शाळेतच आलेली नाहीत. त्यामुळे योग्य ती काळजी घेण्याचा आम्ही प्रयत्न करू, असे वर्षा गायकवाड म्हणाल्या.
तसेच शाळा सुरु करण्यापूर्वी टास्क फोर्सशी आम्ही चर्चा करू आणि नंतरच एसओपी जाहीर करु. सध्या सर्व मुलांची कोरोना चाचणी करण्याची गरज नाही. सध्या राज्य आणि केंद्र सरकारचे कोरोना प्रतिबंधक नियम वेगळे आहेत. त्यामुळे टास्क फोर्सशी चर्चा करुनच एसओपी जारी केली जाईल, असेदेखील वर्षा गायकवाड म्हणाल्या.