नागभिड,दि.09ः- कर्मवीर विद्यालय तथा कला कनिष्ठ महाविद्यालयातून ८१.३३% गुण प्राप्त करून चक्रधर नीलकंठ मेश्राम याने प्रथम क्रमांक पटकावला.तर कर्मवीर विद्यालय तथा कला कनिष्ठ महाविद्यालय अमिर्झा येथील वर्ग १२ वी चा निकाल ९६.३६ लागला आहे. ७९.३३% गुण प्राप्त करून कु. दामिनी गोविंदा मुरतेली हिने द्वितीय क्रमांक तसेच ७८.६७ % गुण प्राप्त करून साहिल निलकंठ जनबंधु याने तृतीय क्रमांक पटकावला.विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय आपले आईवडील तसेच गुरूजन श्री.गभणे,खोब्रागडे , कारेकर मॅडम यांना दिले आहे.
विद्यार्थ्यांच्या यशस्वीतेसाठी गोंडवन विकास संस्था नागभिडचे सचिव रवींद्र जनवार, कर्मवीर विद्यालय तथा कला कनिष्ठ महाविद्यालयाचे मुख्याध्यापक शेंडे, तसेच सर्व कर्मचारी वृंद यांनी शुभेच्छा दिल्या.