निराधार विद्यार्थ्यांचा सारथी-“उमेश कोर्राम”

0
6

नवी दिल्ली – 1२ जून 2022:
तथाकथित गाजलेल्या ओबीसी नेत्यांना खजिल करणारे काम एका सामान्य निराधार कुटुंबातील परिक्षार्थीने *महाज्योती* ही ओबीसी विद्यार्थ्यांसाठीची संस्था जन्माला घालून करून दाखविले.
ओबीसी नावाने ढोल वाजवून 30–40 वर्षांपासून राजकारण शेकणा-या व राजकारणात आपली पुढची स्थापित करणा-या भुजबळ वडेट्टीवार मुंढेंना लाजवेल अशी क्रांतिकारी योजना-संस्था, upsc परिक्षार्थी प्रा.उमेश कोर्रामने बनवून दाखविली.
एससी एसटी ओबीसी वीजेएनटी एनटी एसबीसी अशा सर्व मागास समाजातील विद्यार्थ्यांना लाभदायी ठरेल अशा मागण्या सरकार दरबारी पोहचवत विद्यार्थ्यांना नि:शुल्क सेवा सुविधा देणारे हुनरबाज विद्यार्थी नेतृत्व उमेश कोर्राम सध्या सर्व राज्याच्या विद्यार्थ्यांमध्ये दिल्लीत कौतुकाचा विषय झाला आहे। अने राज्यांच्या विद्यार्थ्यांनी आपापल्या राज्यात या योजनांसाठी आज दिल्रीत उमेश कोर्राम यांची भेट घेतली.

जवळपास एक महिना घर सोडून मुंबईत ठाण मांडून वारंवार बैठक भेटीगाठी कागदपत्र, मुख्यमंत्र्यांची भेट, विधानसभेत मुद्दा उपस्थित करणारे सदस्य आमदार शोधणे, विषय देणे, आदी कामासाठी चालतेबोलते कार्यालय उमेश आणि टीमने चालवले. या सर्व घडामोडीपाठीवर बारकाईने नजर व सूचना करणारे कमलेश पाटील यांचे संचालन कमी येत होते.

बार्टी TRTI सारथी च्या धर्तीवर obc विद्यार्थ्यांसाठी एक स्वतंत्र संस्था असावी यासाठी दि.26 मार्च 2019 पहिला प्रताव तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना स्टुडंट यूनियन असोसिएशन आॅफ ईंडिया तर्फे पहिला प्रस्ताव दिला गेला. नंतर चालू असलेल्या विधानसभा अधिवेशनात विषय मार्गी लागण्यासाठी उमेश कोर्राम, रणजित ठिपे, आकाश बांबोडे, नीतीन ईंगळे, किरण परदेशी, प्रशांत उंदिरवाडे याच्या चमूच्या कठिण मेहनतीचे योगदान मैदान मारत राहिले. उमेशने, आमदार बच्चूभाऊ कडू जितेंद्र आव्हाड छगन भुजबळ धनंथय मुंढे खा.इम्तियाज जलील यांना भेटून, मुख्यमंत्री फडणवीस व संबंधित विभागाचे मंत्री डॉ संजय कुटे , सारथीचे संचालक परिहार यांच्याशी वारंवारच्या भेटीगाठी ते विधानसभेतील प्रस्ताव मंजूरी व संस्थेचे नाव महात्मा ज्योतिबा फुले यांच्या नावावरून महाज्योती ठरवण्यापर्यंत उमेश कोर्रामने सक्रिय भूमिका निभावली. सहज साधारण स्वभावाचा माणूस अधिकारी म्हणून परिहार यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

#आज शिवमान उमेश कोर्राम यांना मराठा सेवा संघाच्या वतीने दिल्लीस्थित महाराष्ट्र सदनातील प्रशस्त परिसरात *पानिपत मराठा शौर्यदिन समारोह सम्मान चिन्ह आणि मराठा सेवा संघ द्वारे प्रकाशित *शिवधर्म कैलेंडर -2022* देऊन गौरवान्वित करताना मराठा सेवा संघाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष शिवक्रांतीदूत कमलेश पाटील, दिल्ली प्रदेश अध्यक्ष तथा सुप्रीम कोर्टाचे वरिष्ठ वकिल आकाश काकडे जी. सोबत टीमचे सदस्य शिवश्री आकाश बोंबडे, मनोज सुरोसे, संकेत पाटील, अक्षय वानरे, कमलेश उके, खुशाल सेठ उपस्थित होते.