सिनेटमध्ये नोंदणी करा-दिशांत चन्ने

0
17

 देवरी,दि.12 – राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातर्फे सिनेट सदस्य निवडीसाठी पदवीधर नोंदणी नागपूर विद्यापीठांतर्गत भंडारा, गोंदिया, नागपूर आणि वर्धा जिल्ह्यात सिनेट नोंदणी सुरु आहे. जिल्ह्यातील प्रत्येक पदवीधारकाने आपली नोंदणी करावी, असे आवाहन भाजप विद्यार्थी मोर्च्याचे तालुकाध्यक्ष दिशांत चन्ने यांनी केले आहे.
सिनेट ही शैक्षणिक सभागृहातील सर्वोच्च संसद आहे. ज्यामध्ये 10 सदस्य नोंदणीधारकांद्वारे निवडले जातात. हे निवडून आलेले सिनेट सदस्य महाविद्यालय परिसरात योग्य वातावरण, सकारात्मक नियंत्रण, विविध योजनांचा मसुदा तयार करणे, अर्थसंकल्प तयार करणे आणि विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन त्याची अंमलबजावणी करणे यासाठी काम करतात.
या शृंखलेत देवरी तालुक्यात सामाजिक कार्य करण्यासाठी सिनेट नोंदणी कार्य सुरू आहे. भाजप विद्यार्थी मोर्चाचे तालुकाध्यक्ष दिशांत चन्ने यांनी सर्व पदवीधरांनी आपापल्या गावातील, तालुक्यातील आणि जिल्ह्यातील सर्व पदवीधरांना माहिती देऊन यात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.