गोंदिया,दि.14ः- महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक मंडळातर्फे घेण्यात आलेल्या वर्ग १२ वीच्या परीक्षेत एक्यूट पब्लिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी कमालीचे यश संपादन करून आपल्या शाळेचे, शिक्षकांचे व पालकांचे नाव उंचावले आहे. शाळेचा एकूण निकाल १००% टक्के असून शाळेतून वाणिज्य शाखेत कैफ अंसारी या विद्यार्थ्याने ९७.३३ टक्के गुण प्राप्त करून पूर्ण गोंदिया जिल्ह्यात प्रथम क्रमांक प्राप्त केला तर कुमारी नीलम उईके या विद्यार्थीनीने ७७.५० टक्के गुण प्राप्त करून द्वितीय क्रमांक प्राप्त केला आहे.तसेच एक्युट पब्लिक शाळेच्या विज्ञान शाखेतून ओम कटरे विद्यार्थ्याने ८९.१७ टक्के गुण प्राप्त करून प्रथम क्रमांक प्राप्त केला तर गौरव ठकरेले या विद्यार्थ्याने ८७.५० टक्के गुण प्राप्त करून द्वितीय क्रमांक प्राप्त केला.प्रणय बावनकर या विद्यार्थ्याने ८५.८३ टक्के गुण प्राप्त करून तृतीय क्रमांक प्राप्त केला.
आयोजित सत्कार समारोहमध्ये विद्यार्थ्यांचे व त्यांच्या पालकांचे पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आले. विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय संस्थेचे अध्यक्ष श्रीमती गीताताई भास्कर, सचिव संजयकुमार भास्कर, सहसचिव श्रीमती शुभाताई शहारे तसेच शाळेचे प्राचार्य अमित कुमार,मुख्याध्यापिका श्रीमती उज्ज्वला पारधी,पर्यवेक्षक प्रविणकुमार मेश्राम ,शिक्षक कुमारी ललिता कुथे, कुमारी रागिणी शाहू,श्रीमती अनिता नेवारे ,श्रीमती मोनू मंझोटे ,श्रीमती सुषमा नागपुरे ,कुमारी खुशबू तुरकर, कुमारी विद्या कोरे,कुमारी ज्योती चव्हाण तसेच शिक्षकेत्तर कुमारी अश्विनी खोब्रागडे व आई वडिलांना दिले आहे. सर्व यशस्वी विद्यार्थ्या नासंज्योत बहुउद्देशिय शिक्षण संस्थेने उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.