ज्योतिकझेप व षष्ठ्यब्दीपूर्ती ग्रंथाचे प्रकाशन

0
12

गोंदिया,दि.14ः- येथील सामाजिक कार्यकर्ते व कवी सेवानिवृत्त प्रा.ज्योतिक ढाले गौरवग्रंथ ज्योतिकझेप या ग्रंथाचा प्रकाशन सोहळा आणि १० जून रोजी प्रा.ज्योतिक ढाले यांनी वयाची साठ वर्षे केल्यानिमित्ताने आयोजित षष्ठ्यब्दीपूर्ती समारंभात करण्यात आला.
प्रकाशन सोहळ्याचे आणि षष्ठ्यब्दीपूर्ती समारंभाला अध्यक्ष ‌म्हणून आंबेडकरवादी विचारवंत, कथाकार, माजी प्राचार्य डॉ.प्रकाश खरात उपस्थित होते.यावेळी डाॅ.खरात अध्यक्षस्थानावरुन बोलतांना प्रा.ज्योतिक ढाले यांचा गौरव का होतो तर सरांनी १९८१ पासून सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, साहित्य क्षेत्रात मोलाचे योगदान दिले. म्हणून ज्योतिकझेप हा गौरवग्रंथ समकालीन मित्रांनी काढला.गौरवग्रंथाचे संपादक प्रा.कुलदीप शेंडे यांनी संपादकीय लेखामध्ये प्रा.ढाले यांच्या जीवनासंघर्षाचा लेखाजोखा मांडला.उजेडाची दोस्ती करताना अंधार चिरत जात होता.असं प्रा.ढालेंच साहित्य आहे. षष्ठ्यब्दीपूर्तीच्या सरांना शुभेच्छा! प्रा.ढाले यांनी सतत वाड्मयीन लेखन सुरूच ठेवावे यासाठी सदिच्छा!
यावेळी ज्योतिकझेप या गौरव ग्रंथाचे प्रकाशन सदस्य सचिव डॉ बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समिती महाराष्ट्र शासन मुंबईचे डॉ.प्रदीप आगलावे यांच्या हस्ते झाले. यावेळी बोलताना डॉ.प्रदीप आगलावे म्हणाले, प्रा.ज्योतिक ढाले यांचे व्यक्तिमत्त्व हसमुख असलं तरी समाज चिंतन करतांना गंभीर आहे. हे त्यांच्या कवितेतून व वैचारिक लेखांमधून जाणवते.पुढेही असेच लेखनकार्य आणि सामाजिक कार्य सुरूचं ठेवावे असे म्हणाले.
ज्योतिकझेप या गौरव ग्रंथावर भाष्य करताना मराठीचे जेष्ठ कवी, कथाकार, प्रमोदकुमार अणेराव म्हणाले, प्रा‌.ज्योतिक ढाले म्हणजे लोहचुंबक. माणसं जोडण्यासाठी शैली अत्यंत प्रभावी आहे. या शैलीतून जसं साहित्य उभं राहिलं, तसं मानसं उभे राहतात. असं हे व्यक्तिमत्त्व आहे. म्हणूनचं विचारवंतांनी आणि समकालीन मित्रांनी ढाले सरांचं जीवन संघर्ष आणि साहित्यावर लेख लिहून, कृतज्ञता व्यक्त केली.
ज्योतिकझेप प्रकाशन समारंभ आणि षष्ठ्यब्दीपूर्तीच्या कार्यक्रमाते प्रास्ताविक गौरवग्रंथाचे संपादक प्रा.कुलदीप शेंडे यांनी केले. सूत्रसंचालन आकाशवाणीचे सेवानिवृत्त वरिष्ठ उदघोषक अशोक जांभुळकर यांनी केले.तर आभारप्रदर्शन मा.कमलेश कळमकर यांनी केले.
यावेळी कार्यक्रमात डॉ.रमेश जनबंधू, डॉ.विलास गजभिये, लोकनाथ यशवंत, हृदय चक्रधर, प्रदीप फुलझेले, जयंत निमसरकार, पांडुरंग डवले, शशिकांत वाळके, सुरेश कळमकर, ज्योत्स्ना गजभिये,मंदा फुसाटे,सिमा डवले, वर्षा ढाले, डुडेश्वर कोटांगले, राजू फुसाटे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.