मॉडेल कॉन्व्हेंट एन्ड विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाचा 100 टक्के निकाल,तुषार ठाकरे तालुक्यात प्रथम

0
42

गोरेगाव,दि.18:शुक्रवारला जाहीर झालेल्या वर्ग 10 वि च्या निकालात गोरेगाव येथील मॉडेल कॉन्व्हेंट व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाने उत्तम निकालाची परंपरा कायम ठेवली आहे.या विद्यालयाचा विद्यार्थी तुषार नेवालाल ठाकरे याने 96.40% टक्के गुण प्राप्त करीत तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे.तर कु.यादवी महेशकुमार चौधरी 94.60% हिने तालुक्यात व्दितीय क्रमांक पटकावला आहे.मानसी दिनेश रहांगडाले 93.00% गुण घेवून तृतीयस्थानी यश संपादन केले आहे. एकूण 41 विद्यार्थी परीक्षेला बसले,त्यापैकी 31 विद्यार्थी प्राविण्य श्रेणी, 10 विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले. शाळेचा 100% टक्के निकाल लागला असून प्राविण्य प्राप्त विध्यार्थ्यांचे शाळेचे संस्थापक आर.डी.कटरे, प्राचार्या सौ छाया पी.मेश्राम,सौ.एस.आर.कटरे,कु.एस.डी.चिचामे यांच्याकडून पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आले. दहावीच्या विद्यार्थ्यांनी आपल्या उज्वल यशाचे श्रेय प्राचार्य व सर्व शिक्षक वृंद यांना दिले. सर्व यशस्वी विध्यार्थ्यांचे शाळेचे संस्थापक, प्राचार्य, सर्व शिक्षक वृंद व इतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आणि पुढील आयुष्याकरीता शुभेच्छा दिल्या.