शिक्षक दिनी पी.डी.रहागंडाले विद्यालयात गुणवंत विद्यार्थांचा सत्कार

0
22

गोरेगांव-येथील पी डी राहांगडाले विद्यालय व कनिष्ट महाविद्यालय येथे शिक्षक दिनाचे औचित्य साधून सत्र 2020-21 व 2021-22 या सत्रातील ईयत्ता दहावी व बारावीत बोर्डाच्या परीक्षेत प्राविण्य प्राप्त विद्यार्थांचे सत्कार करण्यात आले .विद्यार्थ्यांना ग्यानीरामभाऊ देशमुख चॅरिटेबल ट्रस्ट गोरेगाव तर्फे पुरस्कार, निर्मल कॉम्प्युटर गोरेगाव, आयसेक्ट कॉम्प्युटर गोरेगाव व अनंदाबाई फगलाल बघेले स्मॄतिपुरस्कार, स्व.डोमाजी पटले स्मॄतिपुरस्कार, तसेच सेवानिवृत्त मुख्याध्यापक डी डी राहांगडाले यांच्यातर्फे पुरस्कार देण्यात आले.या कार्यक्रमाचे अध्यक्ष ग्रामहिता शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. टी. पी. येडे होते.तर उदघाटक म्हणून संस्थेचे सचिव एड. टी. बी. कटरे व बक्षिस वितरक म्हणून संचालक यू. टी. बिसेन उपस्थित होते. या कार्यक्रमाला सेवानिवृत केंद्रप्रमुख बी.डी.पटले, डी.डी.रहांगडाले, प्राचार्य सी.डी.मोरघडे,पर्यवेक्षक वाय.आर.चौधरी ,व्ही.पी.कटरे ,पालकवर्ग व विद्यार्थी उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वीतेसाठी शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी विशेष प्रयत्न केले.कार्यक्रमाचे संचालन प्रा.सी.आर.बिसेन,प्रा.डी.बी.चाटे, ए.एच.कटरे यानी केले तर आभार एम.डी.रहांगडाले यानी मानले.