शाळा व्यवस्थापन समितीतर्फे शिक्षकांचा सत्कार

0
17

गोरेगाव:– जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळा हिरडामाली येथे शाळा व्यवस्थापन समितीतर्फे शिक्षक दिनाचे औचित्य साधून शाळेला उत्कृष्ट शैक्षणिक दर्जा व आदर्श शाळा करण्यात मोलाचे योगदान प्रदान केल्याबद्दल शाळेत कार्यरत शिक्षकांचे भेटवस्तू व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आले.कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन तसेच भारतरत्न डॉ. सर्वपल्ली राधाकृष्ण यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे उच्चक्षेणी मुख्याध्यापक रविंद्र शहारे तर प्रमुख उपस्थितीत व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष भारतभाऊ ठाकूर, उपाध्यक्ष रमेशभाऊ कुंभलकार, शिक्षणतज्ज्ञ प्रा. लोकेश कटरे ,सदस्य प्रफुलभाऊ उके, शीतलताई मेश्राम, सौ. सुषमा चव्हाण, पदवीधर शिक्षीका कु. नाननबाई बिसेन ,विज्ञान शिक्षक सुरेशकुमार बघेले , स.शिक्षक अजय तितिरमारे , विरेंद्रकुमार पटले , क्रांतीलाल पटले , सविता पटले,एकता कटरे ,मनिषा हरिणखेडे, कु. अगडे , कु.सविता येळे,कु हरिणखेडे प्रामुख्याने उपस्थित होते.कार्यक्रमाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांनी व मान्यवरांनी समोचित मार्गदर्शन केले.तसेच स्वयंशासन उपक्रमात सहभागी विद्यार्थ्यांचे शाळेच्या वतीने भेटवस्तू देऊन गौरव करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन प्रा. लोकेश कटरे तर आभार क्रांतीलाल पटले यांनी मानले.