जात पडताळणी अर्ज कसे सादर करावे यावर शिवाजी सायंसच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

0
19

नागपूर,दि.28ः-  ‘सेवा पंधरवडा’ निमित्ताने सामाजिक न्याय विभाग व बार्टी च्या वतीने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.त्या अंतर्गत जिल्हा जात पडताळणी प्रमाणपत्र समिती नागपूरच्यावतीने 26 सप्टेंबरला शिवाजी विज्ञान महाविद्यालय नागपूर येथील 11 व 12 वी मध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना जात पडताळणी प्रमाणपत्राकरीता अर्ज करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.यावेळी जातपडताळणीकरीता अर्ज सादर केलेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या अर्जातील त्रुट्या दूर करण्यासंदर्भात माहिती देत आक्षेपाची पुर्तता करण्यात आली.नवीन अर्ज करण्याची माहिती देण्यात आली.तसेच  जात प्रमाणपत्र पडताळणीचे अर्ज जात पडताळणी कार्यालयात वर्ग ११ व १२ वी विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांना सादर करण्याची गरज नाही.तर महाविद्यालयात सादर करावे व महाविद्यालयाचे नोडल अधिकारी जात पडताळणी कार्यालयात सादर करतील.मात्र अर्ज सादर करताना सर्व कागदपत्रे साक्षाकींत असावे व खोटे कागदपत्रे सलगंन करु नये याबाबत सुचना उपायुक्त सुरेंद्र पवार यांनी विद्यार्थ्यांना दिल्या.यावेळी 300 हून अधिक शिवााजी विज्ञान महाविद्यालयाचे विद्यार्थी,शिक्षक,पालक व इतर कर्मचारी उपस्थित होते.