धोटे बंधू विज्ञान महाविद्यालया द्वारे एक भारत श्रेष्ठ भारत अभियानांतर्गत कार्यक्रमाचे आयोजन

0
26

गोंदिया,दि.28ः- स्थानिय गोंदिया शिक्षण संस्था द्वारा संचालित धोटे बंधू विज्ञान महाविद्यालयातर्फे संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती वर्षा पटेल, सचिव राजेंद्र जैन,संचालक निखील जैन यांच्या प्रेरणेने तसेच प्राचार्य डॉ. अंजन नायडू यांच्या मार्गदर्शनाखाली एक भारत श्रेष्ठ भारत अभियानाअंतर्गत ‘मराठी वर्णमाला’ या कार्यक्रमाचे आयोजन गुगल मीट या आभासी पटलावर करण्यात आले. भारतीय समाजातील विविध संस्कृतींमध्ये एकता वाढवण्याचे उद्दीष्ट या योजनेचे आहे. या कार्यक्रमांतर्गत दरवर्षी एक राज्य आपल्या संस्कृती आणि पर्यटनाच्या संवर्धनासाठी दुसऱ्या राज्याची निवड करेल आणि दोन्ही राज्यांमधील संवाद विविध माध्यमातून वाढवला जाईल.या अभियानांतर्गत महाराष्ट्रातील धोटे बंधू विज्ञान महाविद्यालय, गोंदिया आणि छत्तीसगढचे श्री शंकराचार्य महाविद्यालय, जुनवानी, भिलाई ही युग्म संस्था म्हणून काम करणार आहेत. याप्रसंगी जे. एम.पटेल महाविद्यालय, भंडाराच्या प्रा. ममता राऊत यांना प्रमुख वक्ता म्हणून म्हणून आमंत्रित करण्यात आले होते. त्यांनी विद्यार्थ्यांना मराठी भाषेचे प्राथमिक ज्ञान देऊन मराठी वर्णमाला, मराठी भाषेतील काही विशिष्ट शब्द आणि म्हणींची माहिती करून दिली.
धोटे बंधू विज्ञान महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.एस.पी.तिमांडे, तसेच श्री शंकराचार्य महाविद्यालय येथील डॉ.पौर्णिमा तिवारी,प्रा.निधी डोंगरे,प्रा.रचना तिवारी यांची प्रमुख उपस्थिती होती.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. स्नेहा जैस्वाल यांनी तसेच आभार प्रदर्शन डॉ. शुभांगी नरडे यांनी मानले.कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता महाविद्यालयाच्या सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.